Crime News : एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये सहा वर्षीय विद्यार्थी आनंद प्रेम याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावला असून तपासात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बिहारच्या मधेपुरा परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT
पोलिसांनी सांगितले की, 7 जून रोजी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला, तसेच फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. सुरुवातीला हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने मृत विद्यार्थ्याची आई गुंजन देवी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक (मुख्यालय) नेसार अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते.
हे ही वाचा : कल्याणमध्ये मध्यरात्री अचानक गोळीबार अन् तुफान राडा.. हादरवून टाकणारी घटना
आक्षेपार्ह अवस्थेत बघितले अन्...
पोलीस तपासादरम्यान संशयाच्या आधारे अंकित कुमार याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली देत धक्कादायक खुलासा केला. आरोपी अंकितचे हॉस्टेल संचालक सुनील कुमार याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. 6 जूनच्या रात्री आनंद प्रेम याने त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि तो जोरात ओरडू लागला. पकडले जाण्याच्या भीतीने अंकितने मुलाला गप्प करण्यासाठी त्याचे तोंड आणि नाक दाबले, ज्यामुळे गुदमरून त्या 6 वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट: कुछ तो मजबूरियाँ रही होंगी, यूँ कोई बेवफा नहीं होता...
गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
अमानुषपणे बालकाची हत्या केल्यानंतर आरोपींनी हा गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हॉस्टेल संचालक सुनील कुमार याच्या मदतीने आधी मृतदेह गायब करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात अपयश आल्याने हत्येचा हा गुन्हा आत्महत्येत बदलण्यासाठी त्यांनी मुलाचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून दिला. पोलिसांनी याप्रकरणी सहरसा जिल्ह्यातील कजरा येथील रहिवासी अंकित कुमार आणि मधेपुरा जिल्ह्यातील मरुआहा येथील रहिवासी हॉस्टेल संचालक सुनील कुमार या दोघांना बेड्या ठोकल्या असून पोलीस आता या प्रकरणाच्या इतर बाजूंचाही शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











