वाटेत अडवून तरुणीला घातली लग्नाची मागणी पण, पीडितेचा नकार अन् संतापलेल्या तरुणाने केलं भयंकर कृत्य!

महाविद्यालयात शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थीनीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे.

संतापलेल्या तरुणाने केलं भयंकर कृत्य!

संतापलेल्या तरुणाने केलं भयंकर कृत्य!

मुंबई तक

• 12:12 PM • 19 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाटेत अडवून तरुणीला घातली लग्नाची मागणी

point

पीडितेने नकार देताच संतापलेल्या तरुणाचं भयंकर कृत्य

point

नेमकं काय घडलं?

Crime News: बंगळुरू येथून हत्येचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थीनीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. तसेच, हत्येत वापरण्यात आलेली बाईक सुद्धा जप्त करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

रागाच्या भरात केली हत्या...

पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणासंबंधी माहिती देताना सांगितलं की, घटनेतील मुख्य आरोपीचं नाव विध्नेश (28) असून तो पीडित तरुणीच्या शेजारी राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचं पीडितेवर प्रेम असल्याकारणाने त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, पीडितेच्या मनात आरोपीविरुद्ध प्रेमाच्या भावना नसल्याने तिने आरोपीच्या लग्नाच्या मागणीला नकार दिला. यामुळे, आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने पीडितेची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: ATS चा अधिकारी असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्धाकडून 1.44 कोटी उकळले, पुण्यातील डिजिटल अरेस्टचं मोठं प्रकरण

लग्नाच्या मागणीला पीडितेचा विरोध   

संबंधित घटना 16 ऑक्टोबर रोजी दुपारी जवळपास अडीच वाजताच्या सुमारास घडली. पीडित तरुणीचं नाव यामिनी प्रिया असून ती फार्मसीच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. दुपारी कॉलेजमधून घरी परतत असताना तिच्यासोबत भयंकर घटना घडली. त्यावेळी, विघ्नेशने यामिनीला रेल्वे रूळाजवळ वाटेत अडवलं आणि तिच्याजवळ जाऊन त्याने पीडितेला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे आरोपी प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात धारदार शस्त्राने यामिनीच्या मानेवर वार केला आणि तिची निर्घृण हत्या केली. 

हे ही वाचा: परीक्षेला बसायला नको, मग विद्यार्थ्यांनी थेट प्राचार्याच्या निधनाची अफवा पसरवली, पोलिसांत तक्रार दाखल

आरोपी पीडितेच्या शेजारीच राहायचा 

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, श्रीरामपुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा पीडितेच्या घरासमोरच राहत होता आणि शेजारी असल्याकारणाने यामिनीच्या कुटुंबियांना सुद्धा त्याची चांगली ओळख होती. मात्र, आरोपी विघ्नेश पीडितेवर लग्नासाठी दबाव आणत होता. या प्रकरणासंबंधी पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासानंतर आरोपी विघ्नेश आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका आरोपीला अटक केली. या घटनेत वापरण्यात आलेली दुचाकी सुद्धा पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. आता प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

    follow whatsapp