फरफटत वॉशरूममध्ये नेलं अन्... कॉलेजमध्येच विद्यार्थीनीवर बलात्कार! नंतर आरोपी फोन करुन म्हणाला की...

मुंबई तक

18 Oct 2025 (अपडेटेड: 18 Oct 2025, 12:09 PM)

एका खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एका 21 वर्षीय तरुणाने त्याच्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सीनिअर विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय?

कॉलेजमध्येच विद्यार्थीनीवर बलात्कार!

कॉलेजमध्येच विद्यार्थीनीवर बलात्कार!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

फरफटत वॉशरूममध्ये नेलं अन्...

point

कॉलेजमध्येच विद्यार्थीनीवर बलात्कार!

Crime news: बंगळुरूच्या एका खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एका 21 वर्षीय तरुणाने त्याच्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सीनिअर विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

संबंधित घटना 10 ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या बसवनगुडी परिसरातील एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये घडली. त्यानंतर, पीडितेने या घटनेबद्दल तिच्या आई-वडिलांना सांगितलं आणि 15 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी तरुण एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. पीडित तरुणी ही सातव्या सत्रात शिकत असून आरोपी पाचव्या सत्राचं शिक्षण घेत आहे. दोघेही एकमेकांना मागील तीन महिन्यांपासून ओळखत होते. पीडितेचा एका विषयात बॅकलॉग असल्याने ती अधूनमधून पाचव्या सत्राच्या वर्गात जात लेक्चरसाठी जायची, तिथेच तिची जीवन गौडा नावाच्या तरुणाशी ओळख झाली.

वॉशरूममध्ये ओढत नेलं अन् घृणास्पद कृत्य...

10 ऑक्टोबर रोजी कॉलेजमध्ये लंच ब्रेक झाल्यानंतर, जीवनने पीडितेला फोन करुन खाली भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर, काहीतरी कारण सांगून त्याला भेटण्यासाठी गेली. मात्र, आरोपी तिला आर्किटेक्चर ब्लॉकच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला आणि पीडितेला त्याने अचानक घट्ट पकडलं. पीडितेने पुढे सांगितलं की ती कशीतरी तिथून निसटून सहाव्या मजल्यावर पोहोचली, पण जीवन तिचा पाठलाग करत तिथे पोहोचला आणि तिला पुरुषांच्या वॉशरूममध्ये ओढत नेलं. त्यानंतर, आरोपीने आतमधून दरवाजा बंद केला आणि पीडितेकडून तिचा फोन हिसकावून घेतला. दरम्यान, तरुणाने पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. ही संपूर्ण घटना जवळपास 1:30 ते 1:50 दरम्यान घडली.

हे ही वाचा: पैसे परत करण्याच्या बहाण्याने शेतात बोलवलं अन् महिलेचा गळा दाबून निर्घृण हत्या! अखेर, 8 दिवसांनंतर...

आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

या भयानक घटनेनंतर संध्याकाळी जीवनने मुलीला पुन्हा फोन केला आणि तिला गोळ्यांची गरज आहे का? असं विचारलं. पीडिता अतिशय घाबरली होती आणि पुढचे काही दिवस गप्प राहिली. नंतर, तिच्या दोन मैत्रिणींनी पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल सांगण्याचं धाडस केलं. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी जीवन गौडाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल केला, जो बलात्काराशी संबंधित आहे. त्याच दिवशी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली.

हे ही वाचा: 'तिचा तो त्रास अनेक दिवसांपासून', 5 वर्षीय मुलीसोबत आईने नको ते केलं; बाप हळहळला अन्..

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना पीडितेच्या संमतीने घडली असल्याचा चौकशीदरम्यान आरोपी तरुणाने दावा केला. आता पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून कॉलेज कॅम्पसमधून पुरावे गोळा करत केले जात आहेत.