Crime News : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील बडखर भागात रविवारी एका मुलाने आपल्याच वडिलांना काठीने मारहाण केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या मारहाणीत तरुणाने आपल्याच वडिलांचा मुडदा पाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत वडिलांचे नाव भैयान मवासी (वय 45) असे आहे. तर हल्लेखोर मुलाचे नाव रिंकू मवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सातारा हादरला! घरात कोणीच नसताना मुलगी कपडे बदलत होती, घरात नराधम शिरला अन् मुलीच्या डोक्यात घातलं दगडी जातं
मिळालेल्या माहितीनुसार, मृत भैयान मवासी हे गेली 15 वर्षांपासून सतना-सेमरिया रस्त्यावरील बडखर येथील लाकडाच्या यार्डमध्ये काम करत होते. तसेच त्यांचा मुलगा रिंकु मवाली हा देखील त्याच ठिकाणी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, दोघांनी मद्यपान केलं होतं आणि त्यातून दोघांमध्ये वाद उफळला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली.
नेमकं काय घडलं?
रविवारी सायंकाळच्या सुमारास वडील आणि मुलगा दोघेही दारु प्यायले होते. तेव्हा नशेत रिंकूने जवळ पडलेली एक काठी घेतली आणि त्याच्याच वडिलांवर हल्ला केला. भैयानच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाल्याने तो गंभीर अवस्थेत होता.
सहकाऱ्यांनी जखमी व्यक्तीला खासगी रुग्णालयात नेले, त्यानंतर तिथून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती केळगव्हाण पोलीस ठाण्याचे प्रभारी टीआय सुदीप सोनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली होती.
हे ही वाचा : मुलगी कपडे काढताना व्हिडिओ शूट केला, नंतर ब्लॅकमेल करत..., प्रसिद्ध युट्यूबरसह त्याच्या मुलाचे हैवानी कृत्य
दरम्यान, आरोपी रिंकूला टोल कर्मचाऱ्यांनी दारुच्या नशेत पकडले आणि खोलीत बंद केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक तपासात दारुच्या आणि वैयक्तिक वादातून हत्या करण्यात आल्याचे उघड झालेय.
ADVERTISEMENT











