मुस्कानने नवऱ्याचा केला खून, नंतर निळ्या ड्रममध्ये टाकले, आता तुरुंगातच करु लागली नवरात्रौत्सवाचा उपवास, सर्वच थक्क झाले

meerut crime : मेरठमध्ये मुस्कान नावाच्या महिलेनं बॉयफ्रेंडच्या मदतीन आपला पती सौरभपची हत्या केली होती. त्यानंतर आता तिच मुस्कान एका बाळाला जन्म देणार आहे. आपल्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती आता उपवास करु लागली आहे.

meerut crime

meerut crime

मुंबई तक

26 Sep 2025 (अपडेटेड: 26 Sep 2025, 05:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुस्कानने सौरभची केली हत्या

point

आता नवरात्रीचा करू लागली उपवास

point

रामायाणाचे करू लागली पठण

Meeruth Crime : मेरठमध्ये निळ्या ड्रममध्ये मुस्कान नावाच्या एका महिलेनं आपला बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीने पती सौरभची हत्या केली होती. त्यानंतर पतीचा मृतदेह हा निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. या घटनेला काही महिने उलटून गेली आहेत. मात्र. आता त्याच मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिलने नवरात्रीत उपवास केला आहे. ती रामायणही पठण करते. मुस्कान सध्या गर्भवती आहे आणि तिला धार्मिक ग्रंथाचे पठण करून मुलाला चांगले संस्कार द्यायचे आहेत. दरम्यान, सौरभची हत्या करणारी मुस्कान तुरुंगात नवरात्रीत उपवास करते.  तुरुंगातून लवकरच सुटका मिळावी, अशी देवाकडे प्रार्थना करते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : धाराशिवच्या अपंग शेतकऱ्याच्या डोक्यावर 40 लाखांचं कर्ज, 15 हजार कोंबड्या पूराच्या पाण्यात वाहून गेल्या, उर बडवत टाहो फोडला

मुस्कान इतकी बदलली कशी?

मुस्कानने इतकी बदलली कशी? असा प्रश्न तुरुंगातील प्रशासनाला उपस्थित झाला आहे. मुस्कानमध्ये झालेल्या एकूण बदलामुळे सर्वच हादरून गेलेत. कारण मुस्कानची प्रतिष्ठा ही सौरभच्या हत्येमुळे पूर्णपणे कलंकित झालेली आहे. मुस्कानने साहिलच्या मदतीने पती सौरभवर चाकूने वार करत खून केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आले होते. तुरुंगातून सुटका मिळावी यासाठी मुस्कान उपवास करू लागली आहे.

मुस्कान गर्भवती

कारागृहाचे तुरुंग अधीक्षक वीरेश राज शर्मा म्हणाले की, तुरुंगातून कोठडीत बंदिस्त असलेली मुस्कान ही सध्या गर्भवती आहे. तर दुसरीकडे दुर्गा मातेचा उपवास करते. एवढंच नाही,तर रामायणाचे पठण करायचे आहे. मुस्कानला तिच्या पोटात वाढणारे मूल सुसंस्कृत असावे असे त्यांना वाटते.

हे ही वाचा : Nashik Crime : मैत्रिणीने चहा प्यायला कॅफेत बोलावलं, नंतर हल्लेखोरांना मेसेज करत दिली टीप, तरुणावर कोयत्याने सपावप वार

दरम्यान, तुरुंगात तब्बल 38 महिला उपवास करताना दिसतात. तुरुंगातील प्रशासकांनी त्यांच्यासाठी पूर्णपणे व्यवस्था केली आहे. मेरठच्या तुरुंगातील अधिक्षकांनी सांगितलं की, मुस्कानला भेटायला कोणीही येत नाही, परंतु साहिलची आजी आणि भाऊ अनेकदा त्याला भेटायला आले.

 

    follow whatsapp