Sameer Wankhede यांचा पाय आणखी खोलात, मनी लाँड्रिंगप्रकरणी आता ED कडून गुन्हा दाखल

मुंबई तक

10 Feb 2024 (अपडेटेड: 10 Feb 2024, 11:32 AM)

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्या नंतर समीन वानखेडे चर्चेत आले होते, ते पुन्हा एकदा आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

ed cbi

ED fir sameer wankhede

follow google news

Sameer Wankhede : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्या नंतर चर्चेत आलेले समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीबीआयनंतर आता मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

25 कोटींची लाच आणि आरोप

समीर वानखेडे आणि इतर 2 एनसीबी अधिकाऱ्यांवर एनसीबीकडून केलेल्या दक्षता तपासात कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 25 कोटींची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप केला असून आता त्याप्रकरणी समीर वानखेडे व त्यांच्या बरोबर असलेले 2 अधिकाऱ्यांना आता ईडीकडूनही समन्स बजावण्यात येणार आहे.

कारवाई करू नये

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना समन्स बजावल्यानंतर, आता वानखेडे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात ईडी ईसीआयआर रद्द करण्यासाठी आणि कोणतीही जबरदस्ती कारवाई न करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापूर्वीच सीबीआय खटल्यासाठीगी त्यांनी अर्ज दाखल केले होते. 

सगळे आरोप फेटाळले

सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची याआधीच चौकशी करण्यात आली आहे. त्याआधीच समीर वानखेडे यांनीही सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावले असून एनसीबी अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा जाहीर आरोपही त्यांनी केला होता. 

एनसीबीच्या विशेष चौकशी

आर्यन खानला 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून अटक झाली होती. कार्डेलिया क्रूझवर धाड टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीच्या विशेष चौकशी पथकाकडून 27 मे 2023 रोजी आर्यन खानला या प्रकरणी क्लीन चीटही देण्यात आली होती.

आर्यन खानचा सहभाग नाही

आर्यन खानला क्लीन चीट देण्यात आल्यानंतर समीर  वानखेडेंनी केलेले आरोप चुकीचे असून आर्यन खानचा अमली पदार्थाच्या विक्री रॅकेटमध्ये त्याचा कोणताही सहभाग नसल्याचा निर्वाळाही नंतर विशेष चौकशी पथकाकडून देण्यात आला होता. 

    follow whatsapp