Abhishek Ghosalkar : मित्र बनला अन् काटा काढला; मॉरिसच्या पत्नीनेच सांगितलं कारण

मुस्तफा शेख

09 Feb 2024 (अपडेटेड: 09 Feb 2024, 07:14 PM)

Statements of morris noronha wife : मॉरिस नरोन्हाच्या पत्नीने सांगितलं का करण्यात आली अभिषेक घोसाळकरांची हत्या?

या प्रकरणात मॉरिस नरोन्हा याच्या पत्नीनेच धक्कादायक खुलासा केला आहे.

Abhishek Ghosalkar Shot dead by mauris noronha

follow google news

Abhishek Ghosalkar Shot dead by mauris noronha reason revealed : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांचे सुपूत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घातल्या. या घटनेनंतर हत्या का करण्यात आली, याबद्दल प्रश्न उपस्थित होताहेत. आता या प्रकरणात मॉरिस नरोन्हा याच्या पत्नीनेच धक्कादायक खुलासा केला आहे. (why mauris noronha killed abhishek Ghosalkar)

हे वाचलं का?

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. हत्याकांडानंतर पोलिसांकडून तपास सुरू असून, ज्याने अभिषेक घोसाळकरांची हत्या केली, त्या मॉरिस नरोन्हाच्या पत्नीने हत्येचे कारण उघड केले आहे. 

अभिषेक घोसाळकरांची का करण्यात आली हत्या?

पोलिसांनी मॉरिस नरोन्हा यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. यात पत्नी, आई आणि मुलीच्या जबाबाचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉरिसच्य पत्नीने पोलिसांना हत्येचे कारण सांगितले. 

पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मॉरिस नरोन्हा एका बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. या प्रकरणामागे अभिषेक घोसाळकरांचा हात असल्याचे आणि त्यामुळेच तुरुंगात जावे लागल्याचे त्याला वाटत होते. 

मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की तो (मॉरिस नरोन्हा) सतत या प्रकरणाबद्दल बोलायचा आणि घोसाळकरांना सोडणार नाही, असं म्हणायचा. जामिनावर बाहेर आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकरांसोबत मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.

हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल उत्तर प्रदेशातील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येसाठी जे पिस्तुल मॉरिसने वापरलं, ते त्याच्या अंगरक्षकाचे आहे. अंगरक्षकाला त्याने याच कारणासाठी कामावर ठेवलं होतं. सूत्रांनी सांगितले की, परवाना असलेल्या बंदुकीचा आणि घटनास्थळी सापडलेल्या परवाना नसलेल्या बंदुकीचा तपास केला जात आहे.

अंगरक्षकाकडे जे पिस्तुल होते, त्याचे लायसन्स हे उत्तर प्रदेसातील फुलपूर येथील आहे. यातून पोलिसांचा असा संशय आहे की, अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा कट खूप काळापासून रचला जात होता. 

    follow whatsapp