Shocking Viral News : हरियाणामध्ये एका धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ माजली आहे. एका महिलेनं 15 वर्षांच्या मुलीला तिच्या प्रियकराकडे नेलं. त्या नराधमाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि पीडित मुलीचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या आईने ही घटना अपघाती असल्याचं म्हटलं. पण एक दिवस या महिलेला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि घडलेली संतापजनक घटना उजेडात आणली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता तिच्या 15 वर्षांच्या मुलीला कुरुक्षेत्र सत्संगमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. तिने पतीला सांगितलं की, ते दोन-तीन दिवसानंतर परत येतील. पण दोन दिवसानंतर महिलेसोबत तिची मुलगी परतलीच नाही. रस्ते अपघातात मुलीचा मृत्यू झाला असं पत्नीने पतीला सांगितलं. त्यानंतर पोलिसांना सांगितलं की, यमुना नगरमध्ये एका ट्रकने मुलीला धडक दिली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसच अज्ञात चालकावर गुन्हाही दाखल केला. त्यावेळी सर्वांना असच वाटलं की, हा एक अपघात होता.
हे ही वाचा >> Vaishnavi Hagawane: हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय... वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले
अचानक झाला या घटनेचा खुलासा
15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू अपघाताने नाही, तर त्या मुलीची हत्या करण्यात आली होती. मुलीची आई संगीताने तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून कैथलच्या लाडी नावाच्या व्यक्तीशी ओळख केली होती. ज्याच्यासोबत तिचं प्रेमसंबंध होतं. लाडीने संगिताचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि मुलीला आणण्यासाठी मजबूर केलं. संगीता तिच्या मुलीला घेऊन कैथलला पोहोचली. जिथे लाडीने माय-लेकीला वेगवेगळ्या रुममध्ये बंद केलं.
बलात्कार आणि हत्येची खतरनाक कहाणी
लाडीने आधी संगीतासोबत शारीरिक संबंध केले. त्यानंतर त्याने मुलीला गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर रेप केला. त्यानंतर पीडित मुलीची तब्येत बिघडली आणि ती जोरजोरात ओरडू लागली. पण तिची प्रकृती गंभीर झाल्यावर लाडीने स्थानिक डॉक्टरांना बोलावलं. पण पीडितेचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर लाडी आणि संगिताने तिचा मृतदेह यमुननगरच्या धोलडा चौक येथे फेकून दिला आणि अपघात झाल्याचा ड्रामा केला. परंतु, पोलिसांनी खाकीचा दणका दाखवल्यावर आरोपी संगीता तिची मैत्रीण, लाडी आणि अन्य दोन जणांना अटक केली.
हे ही वाचा >> शुक्राणू दान करून बनला 67 पोरांचा बाप, पण एक चूक अन्...
ADVERTISEMENT
