Crime news : नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा हॉस्टेलमध्ये मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले आणि नंतर तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी अंत झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या घरात भाजप कार्यकर्त्यांची दहशत, दिराला धक्काबुक्की अन् शिवीगाळ करत विनयभंग
नेमकं काय घडलं?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तेव्हा तपासातून विद्यार्थ्यिनीची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबाने गंभीर आरोप केले की, त्यांच्या मुलीच्या शरीरावर जखमा झाल्याचं सांगण्यात येत असल्याचं ते म्हणाले होते. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचा कुटुंबाने संशय व्यक्त केला. विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून चित्रगुप्त नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एएसपी अभिनव कुमार यांनी सांगितलं की, ही विद्यार्थिनी 5 जानेवारी रोजी घरातून हॉस्टेलला परतली होती. त्यानंतर 6 जानेवारी रोजी रात्री तिने काही हॉस्टेलच्या मैत्रिणींसोबत जेवण केलं होतं. तेव्हा तिच्या खोलीत गेली असता, रात्री उशिरापर्यंत ती बाहेर आलीच नाही. यामुळे वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना भलताच संशय आला होता. या प्रकरणी रुग्णालयातील प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत मुलीच्या गुप्तांगाला दुखापत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्रीरोगतज्ज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत मृत मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अशातच पोलिसांनी तपास केला असता, तिच्या हॉस्टेलच्या खोलीत झोपेच्या गोळ्या आढळून आल्या होत्या. तसेच तिचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, विद्यार्थीनीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचा व्हिडिओ आणि इतर काही वस्तू शोधण्यात आले होते.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांनी आपल्या वाणीवर संयम ठेवावा, तर काही लोकांचे पैसे होणार खर्च
या प्रकरणात पोलिसांनी मृत मुलगी ही किती वेळा झोपेच्या गोळ्या घेत होती याचा तपास सुरु करण्यात आला. तसेच तिनं या गोळ्या कुठून खरेदी केल्या? याचा तपास सुरु आहे. अशातच पोलीस आता पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत, ज्यामुळे मृत्यूचं अद्यापही खरं कारण समोर आलं नाही.
ADVERTISEMENT











