Crime News: एक 8 वीत शिकणारी अल्पवयीन तरुणी रात्रीच्या वेळेत आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिच्या आई-वडिलांसह कुटुंबातील इतर लोकांना दररोज झोपेच्या गोळ्या देत असल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. कुटुंबियांना झोपेच्या गोळ्या देऊन ती रात्रीच्या अंधारात प्रियकराला भेटण्यासाठी जायची. मात्र, तिच्या या कृत्याचा लवकरच खुलासा झाला. एके दिवशी, मुलीच्या आई-वडिलांनी झोपण्याचं नाटक केलं आणि मुलगी घराबाहेर पडताच त्यांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर, तिला प्रियकरासोबत रंगेहात पडकलं.
ADVERTISEMENT
संबंधित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीच्या प्रियकराला शोधण्यासाठी छापे टाकले जात आहेत. परंतु अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. मुलीचे वडील हे मुंबईत रंगकाम करतात आणि ते महिनाभरापूर्वीच मुंबईहून घरी परतले होते. त्यानंतर, त्यांना त्यांच्या मुलीच्या वागण्यात बदल दिसून आला. ती तिच्या मोबाईल फोनवर तासन् तास कोणाशी तरी बोलायची आणि बराच वेळ घराबाहेर असायची. तिच्या या वागण्यामुळे मुलीचे वडील तिला सतत ओरडायचे.
कुटुंबियांना झोपेच्या गोळ्या देऊन प्रियकराकडे जायची...
दरम्यान, रात्रीचं जेवण झाल्यानंतर मुलीच्या वडिलांना अस्वस्थ वाटायचं मग ते गाढ झोपी जायचे. त्यांनी आपल्या पत्नीला आणि कुटुंबातील सदस्यांना सुद्धा याबाबत सांगितलं. त्यावेळी, कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा हाच त्रास होत असल्याचं समोर आलं. मात्र, संबंधित मुलीला मात्र असं काहीच जाणवत नव्हतं. कारण, तीच घरातील लोकांच्या जेवणात गुपचूप झोपेच्या गोळ्या मिसळायची आणि रात्री सगळे गाढ झोपल्यानंतर ती तिच्या प्रियकराला भेटायला जायची.
हे ही वाचा: आधी तरुणीला नाचवलं, नंतर 6 जणांनी मिळून आळीपाळीने केला बलात्कार! उपसरपंचाच्या पतीला अटक
आई-वडिलांनी रंगेहात पडकलं
मुलीचे वडील पोलिसांना या प्रकाराबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांना त्यांच्या मुलीवर संशय आला, म्हणून त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने एक योजना आखली. 3 जानेवारी रोजी त्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले पण, त्यांनी जेवण लपवले आणि नंतर, झोपल्याचं नाटक केले. रात्री 11:30 च्या सुमारास त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा त्यांना त्यांची मुलगी अंगावर शाल ओढून बाहेर जाताना दिसली. त्यानंतर त्यांनी मुलीचा पाठलाग केला आणि ती शेजारी राहणाऱ्या एका तरुणाच्या घरात गेली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी तिला त्या तरुणासोबत रंगेहात पकडलं. तिला याचा जाब विचारला असता ती सुमारे वर्षभरापासून त्या तरुणाच्या संपर्कात असून तो तिला झोपेच्या गोळ्या द्यायचा आणि त्या गोळ्या मुलगी जेवणात मिसळून तिच्या कुटुंबातील सदस्यांना देत असल्याचं तिने सांगितलं.
हे ही वाचा: प्रियकराचा फोन आला पण प्रेयसी भलत्याच तरुणासोबत व्यस्त; रागाच्या भरात थेट तिच्याकडे गेला अन्... नेमकं काय घडलं?
मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली आणि तो प्रचंड संतापला. इतकेच नव्हे तर त्या तरुणाने मुलीच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला लवकरच अटक केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











