प्रियकराचा फोन आला पण प्रेयसी भलत्याच तरुणासोबत व्यस्त; रागाच्या भरात थेट तिच्याकडे गेला अन्... नेमकं काय घडलं?
प्रेमसंबंधातून एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचं दुसऱ्या पुरुषासोबत लग्न ठरल्याने तिच्या प्रियकराने तिची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराचा फोन आला पण प्रेयसी भलत्याच तरुणासोबत व्यस्त
रागाच्या भरात आरोपी तरुणाचं भयंकर कृत्य
Crime News: उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथे प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील सिरसिया परिसरातील बरगदवा गावात एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचं दुसऱ्या पुरुषासोबत लग्न ठरल्याने तिच्या प्रियकराने तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेला लोखंडी रॉड आणि दांडक्याचे तुकडे जप्त केले असून एका आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.
खरं तर, 1 जानेवारीच्या रात्री सिरसिया परिसरातील शाहपूर बरगदवा गावात सुनीता नावाच्या तरुणीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपी आकाशला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी तरुण हा जोखवा बाजार परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हे हत्येचं प्रकरण उघडकीस आलं.
प्रेयसीचं दुसऱ्याच तरुणासोबत ठरलं लग्न...
आरोपी आकाशने चौकशीत सांगितलं की, 8 महिन्यांपूर्वी बरगदवा गावात डीजे बुकिंगदरम्यान, त्याची पीडित सुनीताशी ओळख झाली. त्यानंतर, त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि त्यांच्यात दररोज बोलणं होऊ लागलं. कालांतराने, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि आकाशला सुनीतासोबत लग्न करायचं होतं. काही काळानंतर, सुनीता इतर मुलांसोबत बोलत असल्याचं आणि तिचं लग्नासाठी दुसरीकडे बोलणी सुरू असल्याचं आकाशला समजलं. याच कारणावरून सतत दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. जवळपास 20 दिवसांपूर्वी, आकाशला सुनीताचं लग्न झाल्याची माहिती मिळाली. याच गोष्टीमुळे, आकाश प्रचंड संतापला.
हे ही वाचा: ‘मुंबईत 60 टक्के परप्रांतीय तर मराठी मतदार…’, रामदास आठवलेंनी महायुतीच्या विजयाचं गणित मांडलं
रागाच्या भरात प्रियकराचं भयंकर कृत्य
त्यानंतर, तो 31 डिसेंबर रोजी गावी परतला आणि सुनीताला भेटल्यानंतर तिचं तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिलं जात असल्याचं आकाशला समजलं. दरम्यान, आरोपीने एक योजना आखली. 1 जानेवारी 2026 रोजी आकाश आपल्या काकाच्या बर्थडे पार्टीत गेला होता. त्याने रात्री सुनीताला बऱ्याचदा कॉल केले पण तिचा फोन व्यस्त लागत होता. त्यावेळी, सुनीता दुसऱ्याच तरुणासोबत बोलत असल्याचं त्याला कळालं. दुपारी 3:30 ते 4:00 च्या दरम्यान, तो त्याचा मोबाईल फोन घरी सोडून बाईकवरून सुनीताच्या गावात पोहोचला. त्याने बाईक एका कालव्याच्या कडेला पार्क केली आणि तो सुनीताच्या घरी चालत होती. पीडित सुनीता तिच्या घराच्या अंगणात होती आणि त्यावेळी तिथे आकाश पोहोचल्यानंतर त्याने तिला जाब विचारला इतकेच नव्हे तर, त्याने सुनीताचा मोबाईल फोन सुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.










