Rape Case: एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. संबंधित घटना ही शनिवारी (10 जानेवारी) रात्री बिहारच्या पुर्णिया येथील डगरुआ पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पोलीस ठाण्याच्या केवळ 3 किमी अंतरावर असलेल्या एका खोलीत पीडितेसोबत 6 जणांनी घृणास्पद कृत्य केलं. पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे 6 आरोपी तरुणांविरुद्ध मारहाण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
आधी नाचायला लावलं अन् सामूहिक बलात्कार...
पीडितेने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ती तिच्या घरी जात होती. दरम्यान, वाटेत एक कार तिच्याजवळ येऊन थांबली आणि त्यातील काही लोकांनी तिला बळजबरीने उचलून गाडीत बसवलं. त्यावेळी, आरोपींनी पीडितेला मारहाण केली आणि डगरुआ बॅरिअरजवळ असलेल्या एका खोलीत घेऊन गेले. तिथे पोहोचल्यानंतर, आधी तरुणीला जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडण्यात आलं आणि 6 जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर, त्यातील पाच आरोपी खोलीच्या बाहेर गेले आणि खोलीला आतून कुलूप लावलं. त्यावेळी, एक आरोपी तिच्यासोबत त्या रूममध्ये होता. दरम्यान, तरुणीने संधी साधून त्या आरोपीच्या मोबाईल फोनवरून 112 नंबर डायल केला आणि पोलिसांना फोन लावला.
हे ही वाचा: प्रियकराचा फोन आला पण प्रेयसी भलत्याच तरुणासोबत व्यस्त; रागाच्या भरात थेट तिच्याकडे गेला अन्... नेमकं काय घडलं?
उपसरपंचाच्या पतीला घेतलं ताब्यात...
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी, खोलीला बाहेरून कुलूप लावल्याचं दिसून आलं. त्यानंतर, कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला असता आत पीडितेसोबत डगरुआ गावाच्या उपसरपंचाचा पती जुनैद आलम आढळून आला. पोलिसांनी आरोपी जुनैदला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं आणि पीडितेला मोडिकल तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.
हे ही वाचा: मुलीला बॉयफ्रेंडसोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं, कुटुंबीयांच्या डोक्यात तिडीक गेली; इतकं मारलं की दोघांचाही जीव गेला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींविरुद्ध पीडितेला मारहाण केल्याप्रकरणी आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल असून आरोपी जुनैद आलमला अटक करण्यात आली आहे. तसेच, उर्वरित पाच आरोपींचा शोध घेण्यासाठी छापे टाकले जात आहेत. लवकरच, सर्व आरोपींना अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT











