मुलीला बॉयफ्रेंडसोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं, कुटुंबीयांच्या डोक्यात तिडीक गेली; इतकं मारलं की दोघांचाही जीव गेला
Crime News UP : अधिकची माहिती अशी की, रविवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास दीपक आपल्या प्रेयसी शिवानीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी घरातील छतावर दोघे एकत्र असल्याचं शिवानीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. कथितरित्या, दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्याने कुटुंबीयांच्या रागाचा पारा चढला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी लाठी-काठ्यांनी दीपक आणि शिवानीवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीला बॉयफ्रेंडसोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं,
कुटुंबीयांच्या डोक्यात तिडीक गेली;
इतकं मारलं की दोघांचाही जीव गेला
Crime News UP : उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून रविवारी रात्री एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी ‘ऑनर किलिंग’ची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून संतापलेल्या कुटुंबीयांनी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अमानुषपणे मारहाण केल्याने दोघांचाही मृत्यू झाला. एका रात्रीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना एटा जिल्ह्यातील गढिया सुहागपूर गावात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाची ओळख 25 वर्षीय दीपक (वडील – राधेश्याम) तर मृत तरुणीची ओळख 20 वर्षीय शिवानी (वडील – अशोक) अशी आहे. दोघेही एकाच गावातील आणि एकाच समाजातील रहिवासी होते. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर येत आहे.
अधिकची माहिती अशी की, रविवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास दीपक आपल्या प्रेयसी शिवानीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी घरातील छतावर दोघे एकत्र असल्याचं शिवानीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. कथितरित्या, दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्याने कुटुंबीयांच्या रागाचा पारा चढला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी लाठी-काठ्यांनी दीपक आणि शिवानीवर हल्ला चढवला.
मारहाण इतकी भीषण होती की शिवानीने घटनास्थळीच प्राण सोडले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दीपकला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. एकाच रात्रीत दोन तरुणांचे जीव गेल्याने गावात शोककळा पसरली असून भीतीचं वातावरण आहे.
हेही वाचा : महामुलाखत: 'बाळासाहेब गेल्यानंतर भाजपने शिवसेनेचा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात, अत्यंत गंभीर आरोप










