Crime News : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. गुजरातच्या वानसडा शहरातील एका गावात 15 वर्षाच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईची चक्र फिरवत एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भारतीय संहिता आणि पोक्से अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 40 वर्षीय विवाहित प्रियकराचं 25 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, दोघांनी मिळून वंदेभारत खाली उडी मारत संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये...
पीडित मुलगी रात्री शौचास जाण्यास घराबाहेर पडली अन्...
वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 जानेवारी रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी रात्री 10:30 वाजता शौचास जाण्यास घराबाहेर पडली होती. मोटारसायकलवरून तीन तरुण आले. हे तिघेही पुरुष पीडिता आणि तिच्या कुटुंबाला ओळखत होते, असे वृत्त आहे. आरोपींनी पीडितेचं जबरदस्तीने अपहरण केलं आणि तिला सुमारे 2.5 ते 3 किमी अंतरावर दुसऱ्या गावात घेऊन गेले होते.
पाण्याच्या टाकीजवळील खोलीत नेऊन केले अत्याचार
आरोपींनी पीडितेचं अपहरण केलं आणि नंतर तिला पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीत नेले. त्या ठिकाणी काही वेळापूर्वी एक कार घेऊन काही आरोपी वाट पाहत होते. आरोपीने पीडितेशी शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. तसेच किशोरीने प्रतिकार केल्यानंतर तिला मारहाण केली. त्या आठही जणांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे.
घराबाहेर उभी असलेल्या फॅमिली व्हॅनमध्ये पीडिता आढळली
यादरम्यान काही आरोपींनी पीडितेचे हात आणि पाय दाबले, यामुळे पीडितेला आवाज करता आला नाही. बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास कुटुंब झोपले होते, अशातच वडील जागे झाले असता मुलगी अंथरुणावरच दिसत नव्हती. कुटुंबाने रात्रभर गावात आणि परिसरात तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळी, पीडिता घराबाहेर उभी असलेल्या एका फॅमिली व्हॅनमध्ये आढळली होती, भीतीमुळे तिने दार ठोठावलं नव्हतं असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : कोल्हापुरातील अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला ट्रकनं चिरडलं, अपघातात आईसह कार चालकाचा मृत्यू
पीडितेच्या पालकांनी तिला विचारपूस केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक बी.व्ही. गोहिल म्हणाले की, गुरुवारी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी आठ जणांपैकी सात जण 20 ते 21 वर्षांच्या दरम्यान आहेत, तर एक अल्पवयीन आहे. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT











