कोल्हापुरातील अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला ट्रकनं चिरडलं, अपघातात आईसह कार चालकाचा मृत्यू

मुंबई तक

DYSP Accident : कोल्हापूर, अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इतर तिघेजण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

DYSP Accident
DYSP Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात

point

वाहनातील दोघांचा अंत

DYSP Accident : दीपक सुर्यवंशी - अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इतर तिघेजण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग तालुक्यातील तमटकल्लू गावाजवळ झाला. इनोव्हा ट्रकला धडकल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस 'या' राशीतील लोकांसाठी महत्त्वाचा, तर काहीचं आरोग्य बिघडण्याची शक्यता

डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात

घडलेल्या घटनेनुसार, कोल्हापूर येथील अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील या कार अपघातात प्रवास करत होत्या. त्या कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यातून येत असताना ही घटना घडली. या धक्कादायक घटनेत त्यांची आई कमला (वय 65) आणि कार चालक राकेश (वय 40) यांचा मृत्यू झाला. डीवायएसपी वैष्णवी पाटील आणि इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर चित्रदुर्गातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या सभेआधी उद्धव ठाकरेंची मुंबई Tak वर Super Exclusive महामुलाखत

वैष्णवी या आपल्या आईसोबत तामिळनाडूला सहलीला गेल्या होत्या. त्यानंतर त्या कोल्हापूरला परतत असताना पहाटे हा भीषण अपघात झालाय . सीपीआय बालचंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. ही घटना चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp