एकमेकींना जमिनीवर पाडलं,सासू-सूनेने झिंज्या उपटल्या, मुलगा व्हिडिओ…

प्रशांत गोमाणे

27 Jul 2023 (अपडेटेड: 27 Jul 2023, 02:59 PM)

उत्तर प्रदेशमध्ये सासू-सूनेमध्ये भांडण होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन पोलिसांनी आता सासू आणि सासरे यांच्याविरोधात कलम 151 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

mother in law fight with sister in law husband viral video aligarh uttar pradesh story

mother in law fight with sister in law husband viral video aligarh uttar pradesh story

follow google news

सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादाय़क व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सासू-सूनेमध्ये भांडण होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन पोलिसांनी आता सासू आणि सासरे यांच्याविरोधात कलम 151 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. (mother in law fight with sister in law husband viral video aligarh uttar pradesh story)

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) डोरी नगर परिसरात भूप प्रकाश यांची पत्नी आणि मुलगा त्याच्या बायकोसोबत राहत होता. भूप प्रकाश यांच्या मुलाचे लग्न काही वर्षापुर्वीचे झाले होते. या लग्नापासून त्याला तीन मुली आहेत. भूप प्रकाश यांचा मुलगा कोणतेही कायमस्वरूपी काम करत नसल्याने घरात नेहमीच भांडणे व्हायची. सासू-सासरे आणि सूनेमध्ये यावरून नेहमीच वाद व्हायचे. याच भांडणातून आता सासू-सूनेमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा : Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला

सूनेने याआधी सासूला मारहाण केली होती. या मारहाणीचा बदला म्हणून आता सासूने सूनेला मारहाण केली आहे. सासूने सू्नेच्या झिंज्या उपटल्या आणि जमिनीवर तिचे डोके आपटून तिला बेदम मारहाण केली होती. या घटने दरम्यान नवरा हा घटनास्थळीच उभा होता, त्याने बायकोचे आणि आईचे भाडंन मिटवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याऐवजी त्याने सासू आणि सूनेच्या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला होता. नवऱ्याने रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता सासू आणि सासरे यांच्याविरोधात कलम 151 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

गांधी पार्क पोलीस ठाण्याचे एसएचओ रविंद्र कुमार दुबे या प्रकरणावर म्हणाले की,दोन्ही पक्षाकडून कोणतीच तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन सासू राणी देवी आणि सासरे भूप सिंह यांच्याविरोधात 151 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे त्यांचे कौटुबिक प्रकरण आहे, असे देखील पोलीस म्हणाले आहेत.

य़ा प्रकरणात सुनेचा आरोप आहे की, मला तीनही मुली आहेत, एकही मुलगा नाही आहे. यावरून सासू मला नेहमीच टोमणे मारून माझ्याशी भांडायची, असे तिने म्हटले आहे. तसेच घरात नेहमीच भांडणे व्हायची. कारण मुलाकडे कोणतीच कायमस्वरूपी नोकरी नव्हती. त्यामुळे सुनेने घर मुलाच्या नावावर करण्याची मागणी केली होती. कारण सासू-सासऱ्यांचा एकच मुलगा होता. या सर्व घटनांमुळे कुटुंबियांमध्ये नेहमीच वाद व्हायचे.याच वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

    follow whatsapp