प्रियकरासोबत पाहिल्याने 5 वर्षीय मुलाला आईनेच छतावरुन फेकलं, पोलीस पतीने पुरावे गोळा केले; आईला जन्मठेप

MP Crime News : अधिकची माहिती अशी की, ज्योती राठोड ही तिच्या शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत घराच्या छतावर होती. याचवेळी तिचा पाच वर्षांचा मुलगा अचानक छतावर आला. मुलाने आपल्या आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले. आपले अनैतिक प्रेमसंबंध उघडकीस येतील आणि मुलगा ही गोष्ट वडिलांना सांगेल, या भीतीने ज्योती राठोड आणि तिच्या प्रियकराने मिळून मुलाला दोन मजल्यांवरून खाली फेकून दिल्याचे तपासात समोर आले.

MP Crime News

MP Crime News

मुंबई तक

20 Jan 2026 (अपडेटेड: 20 Jan 2026, 10:02 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासोबत पाहिल्याने 5 वर्षीय मुलाला आईनेच छतावरुन फेकलं

point

पोलीस पतीने पुरावे गोळा केले; आईला जन्मठेप

MP Crime News : प्रियकरासोबत पाहिल्याने 5 वर्षीय मुलाला आईनेच छतावरुन फेकल्याची धक्कादायक घटना एप्रिल 2023 मध्ये घडली होती. या प्रकरणात आता ग्वालियरमधील चिमुकल्याची हत्या केल्याप्रकरणी न्यायलयाने आईला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पतीनेच यासंबंधीचे पुरावे न्यायालयाता सादर केले आहेत. दरम्यान, या घटनेतील प्रियकर पुराव्याअभावी निर्दोष सुटलाय.  या घटनेने केवळ ग्वालियरच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ही घटना 28 एप्रिल 2023 रोजी ग्वालियर शहरातील थाटीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. 

हे वाचलं का?

अधिकची माहिती अशी की, ज्योती राठोड ही तिच्या शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत घराच्या छतावर होती. याचवेळी तिचा पाच वर्षांचा मुलगा अचानक छतावर आला. मुलाने आपल्या आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले. आपले अनैतिक प्रेमसंबंध उघडकीस येतील आणि मुलगा ही गोष्ट वडिलांना सांगेल, या भीतीने ज्योती राठोड आणि तिच्या प्रियकराने मिळून मुलाला दोन मजल्यांवरून खाली फेकून दिल्याचे तपासात समोर आले.

हेही वाचा : मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा होणार महापौर, 44 वर्षांपूर्वीचा इतिहास घ्या जाणून

दोन मजल्यांवरून खाली पडल्याने तो चिमुकला रस्त्यावर गंभीर अवस्थेत तडफडत होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या संपूर्ण काळात आई ज्योती राठोड मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयातही पोहोचली नव्हती. पडण्यामुळे मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जयारोग्य रुग्णालयात त्याच्यावर एक दिवस उपचार सुरू होते. मात्र, 29 एप्रिल 2023 रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचेच मानले जात होते. घरातील सदस्य आणि मृत मुलाचे वडील, जे पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंह आहेत, यांनाही निष्काळजीपणामुळे मुलाचा पाय घसरून तो खाली पडला असावा, असे वाटत होते. त्यामुळे सुरुवातीच्या तपासातही कोणताही संशय व्यक्त करण्यात आला नव्हता.

मात्र, घटनेनंतर तब्बल 15 दिवसांनी आई ज्योती राठोडला पश्चात्ताप झाला. तिने आपल्या पती ध्यान सिंह यांच्याशी बोलताना, “माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे,” असे सांगितले. या वाक्यामुळे ध्यान सिंह यांना संशय आला. त्यांनी पत्नीला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली. त्यानंतर ज्योती पूर्णपणे कोसळली आणि तिने संपूर्ण घटना पतीसमोर कबूल केली.

या संभाषणाची ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग ध्यान सिंह यांनी करून ठेवली. तसेच घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही त्यांनी मिळवले. सर्व पुरावे एकत्र केल्यानंतर ध्यान सिंह यांनी थाटीपूर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी ज्योती राठोड आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला आणि न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विजय शर्मा यांनी पोलिसांच्या वतीने बाजू मांडली. सर्व पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर न्यायालयाने आई ज्योती राठोड हिला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, पुरेसे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने तिच्या प्रियकराची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

BMC Mayor: एकनाथ शिंदेंचा महापौर बसू शकतो, भाजपसोबत ‘प्रेशर टॅक्टीस’मागे ‘या’ आहेत 10 शक्यता

    follow whatsapp