राहुल हांडोरेने पुण्यातच रचलेला दर्शना पवारच्या हत्येचा कट?, ‘त्या’ दुकानामुळे…

मुंबई तक

26 Jun 2023 (अपडेटेड: 26 Jun 2023, 12:28 PM)

दर्शना पवार या तरुणीचा तिचाच मित्र राहुल हांडोरेने केलेली हत्या म्हणजे आधीच रचलेला एक कट होता. असा संशय पोलिसांना आहे. याबाबत त्यांना काही पुरावे देखील सापडले आहेत.

Pune murder of Darshana Pawar by her friend Rahul Handore was a pre-planned conspiracy. police found some evidence in this regard.

Pune murder of Darshana Pawar by her friend Rahul Handore was a pre-planned conspiracy. police found some evidence in this regard.

follow google news

Darshana Pawar Murder Case: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) घवघवीत यश मिळवून क्लास वन अधिकारी बनलेल्या दर्शना पवारची हत्या (Darshana Pawar Murder) तिच्या मित्रानेच केल्याचं उघड झाल्यापासून या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की, राहुल हांडोरेने (Rahul Handore) रागाच्या भरात दर्शनाची हत्या केली होती. मात्र, राहुलने केलेली दर्शनाची हत्या ही काही एका क्षणातील कृती नव्हती. तर राहुलने पुणे सोडण्याआधीच दर्शनाच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती समोर आली. (mpsc pune murder darshana pawar accused friend rahul handore preplanned conspiracy police suspect marathi news headlines)

हे वाचलं का?

आतापर्यंत या घटनेबाबत अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. मात्र, आता आरोपी राहुल हांडोरे याच्या अटकेनंतर दर्शना पवारच्या हत्येबाबत अनेक गोष्टी उघड करत आहेत. दरम्यान, पोलीस सुत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार, आरोपी राहुलने राजगडला जाण्याआधीच म्हणजे पुण्यातच दर्शनाच्या हत्येचा कट रचल्याचं आता समोर आलं आहे. जे एका दुकानामुळे आता उघड झालं आहे. जाणून घेऊयात याचविषयी सविस्तरपणे.

पुणे, राहुल अन् दर्शना…

दर्शना पवार आणि राहुल हांडोरे हे लहानपणापासूनच एकमेकांचे मित्र होते. दर्शना जेव्हा-जेव्हा आपल्या मामाच्या घरी जायची तेव्हा-तेव्हा तिचा मित्र राहुल तिला तिथे भेटायचा. कारण त्याच घरासमोर दर्शनाचा मामा राहत होता. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच दोघांची गट्टी होती. अशातच आपल्याला मोठं अधिकारी व्हायचंय असं दोघांचंही स्वप्न.

दर्शना आणि राहुल दोघंही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. त्यामुळे पदवीचं शिक्षण सुरू असतानाचा त्यांनी MPSC परीक्षेसाठी सुरुवात केली. पदवीचं शिक्षण पूर्ण होताच राहुलने थेट पुण्याला जाऊन MPSC परीक्षेसाठी तयारी करायची असं ठरवलं. तर दुसरीकडे दर्शनाने देखील पुण्यात येऊन MPSC च्या अभ्यासाला सुरुवात केली. दर्शनाला तिचं ध्येय व्यवस्थितपणे ठावूक होतं. त्यामुळेच तिने संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रीत केलं होतं.

हे ही वाचा >> Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…

अशावेळी एके दिवशी पुण्यातच असलेल्या राहुलला समजलं की, त्याची बालमैत्रीण दर्शना ही देखील आता पुण्यातच राहते आहे. सहाजिकच राहुलला आनंद झाला. त्याने लागलीच दर्शनाशी संपर्क साधला. तिला देखील राहुला भेटून आनंद वाटला. कारण पुण्यासारख्या काहीशा अनोळख्या ठिकाणी तिला तिच्या ओळखीचं असं कोणी तरी भेटलं.

हळूहळू दोघं कायम भेटत राहिले. पण बहुदा अभ्यासाच्या निमित्ताने किंवा MPSC परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या खरेदीसाठी. राहुलचं म्हणणं आहे की, तो तिला MPSC अभ्यासात पुस्तकं विकत घेण्यात, शॉपिंगमध्ये मदत करायचा. तिचा हितचिंतक म्हणून तिच्यासोबत राहायचा. या सगळ्यात राहुल दर्शनाचा प्रेमात पडला.

यावेळी हळूहळू राहुल हा दर्शनाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. राहुल आपला मित्र आहे या समजुतीतून दर्शना ही त्याची मदत स्वीकारत होती. पण याचाच राहुलने चुकीचा अर्थ घेतला. त्याला वाटलं की, दर्शना देखील त्याच्या प्रेमात पडली आहे. मात्र, असं अजिबात नव्हतं.

एकीकडे राहुलच्या मनात हे सगळं सुरू असताना दुसरीकडे दर्शना ही मात्र, अगदी मन लावून आपला अभ्यास करत होती. ज्याचं तिला फळही मिळालं कारण MPSC परीक्षेत दर्शना ही संपूर्ण राज्यातून तिसरी आली. त्यामुळेच तिची निवड ही थेट वन विभागात क्लास वन अधिकारी म्हणून झाली.

पण दुसरीकडे तिचाच बालमित्र राहुल हा मात्र, MPSC परीक्षा पास होण्यात अयशस्वी ठरला. एकीकडे घरातील बेताची परिस्थिती असताना फक्त पुण्यात राहून अभ्यास करणं हे राहुलच्या दृष्टीने सोयीस्कर नव्हतं. त्यामुळे त्याने पार्ट-टाइम जॉब म्हणून फूड डिलिव्हरी करणं सुरू केलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राहुलला समजलं की, दर्शना ही एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे राहुलने दर्शनाशी संपर्क साधला आणि कार्यक्रमानंतर जवळच किल्ल्यावर ट्रेकला जाण्याचा प्लॅन तिला सांगितला. दर्शना देखील थोडासा निवांतपणा मिळेल म्हणून राहुलसोबत जाण्यासाठी तयार झाली.

राहुलने पुण्यातच ठरवलेलं दर्शनाला संपवायचं?

पण यानंतरच सगळं चित्र पालटून गेलं. दर्शना ही क्लास वन अधिकारी होणार हे स्पष्ट झालं होतं. अशावेळी राहुलच्या मनात तिच्याशी लग्नाचे विचार घोळू लागलेले. त्यामुळे राहुलने ट्रेकच्या निमित्ताने याचा प्रस्ताव मांडायचा असं ठरवलं. खरं तर हा इथवर सारं काही ठीक होतं. पण ती जर नाही म्हणाली तर… हा विचार डोक्यात ठेवून राहुलने एक कट रचण्यास सुरुवात केली.

12 जून रोजी पुण्यातून निघाल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी साधारण 8.30 च्या सुमारास दर्शना आणि राहुल पोहचले. हे अंतर पुण्यापासून साधारण 65 किमी आहे. दोघेही बाइकने राजगडच्या पायथ्यापर्यंत गेले आणि तिथे पोहचल्यावर त्यांनी ट्रेकला सुरूवात केली. याच दरम्यान जेव्हा ते सतीचा माळ येथे पोहचले तेव्हा त्यांनी तेथील एका ठिकाणी थोडासा विसावा घेतला. हीच वेळ योग्य असल्याचं पाहून राहुलने दर्शनाला सांगितलं की, त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण दर्शनाने राहुलचा हा प्रस्ताव तिथल्या तिथेच फेटाळला. पण याच मुद्द्यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला.

हे ही वाचा >> आजी नातवाच्या मृतदेहाला सलग 10 दिवस घालत होती आंघोळ, बदलायची कपडे!

यावेळी राहुलने अचानक आपल्या खिशातून एक ब्लेड काढलं आणि अचानक दर्शनाच्या मानेवर एक जोरदार वार केला. हा वार एवढा भयंकर होता की, दर्शनाच्या मानेतून प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी दोघांमध्ये झटापट देखील झाली. पण यावेळी दर्शना ही खाली कोसळली. हीच संधी साधून राहुलने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि थेट दर्शनाच्या डोक्यात घातला. या आघाताने दर्शनाचा जागीच मृत्यू झाला. पण नराधम राहुल इथेच थांबला नाही तर त्याने सोबत आणलेल्या बेल्डने तिच्या संपूर्ण शरीरावर वार करण्यास सुरुवात केली.

खरं तर राहुलने राजगड गाठण्याधीच म्हणजे पुण्यातच दर्शनाच्या हत्येचा कट रचला असावा असा आता पोलिसांना देखील संशय आहे. कारण अतिशय धारदार असं ब्लेड सोबत ठेवलं होतं. ब्लेड जरी छोटंसं असलं तरीही खूप इजा पोहचवणारं आहे. आता राहुलने ही ब्लेड जिथून विकत घेतली होती. ते दुकान देखील पोलिसांना सापडलं आहे.

यामुळेच पुणे ग्रामीण पोलिसांना संशय आहे की, राहुलने अतिशय थंड डोक्याने आणि कट रचून दर्शनाची हत्या केली. आता याच प्रकरणाचा पोलीस हे अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp