Mumbai Crime : मुंबईतील बांद्रा येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या ओळखपत्रावर प्रेयसीला नेले आणि तिच्यासोबत वेळ घालवला. वडोदरा येथे असलेल्या पत्नीला याबाबतची माहिती मिळताच, तिने पोलीस ठाणे गाठून कारवाई केली. बांद्रा पोलिसांनी हाय-प्रोफाइन प्रकरणाता शोध घेत माहिती मिळवली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शाळेतून घरी येताना 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेचे डोळे काढून उसाच्या शेतात आढळला मृतदेह
महिला आणि पती या दोघांमधील नातेसंबंधांच्या घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरु
या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा झाला असता, महिलेच्या वकिलांनी त्यांना फोनद्वारे संपर्क केला. दरम्यान महिला आणि पती या दोघांमधील नातेसंबंधांच्या घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरु आहे. नात्याच्या तडजोडीबाबत वकिलांनी सांगितले की, पती हॉटेलमध्ये एका महिलेसोबत दिसला होता. जेव्हा पत्नीने स्वत: चेक इन केले, तेव्हा ती तिथे नसतानाही हॉटेलच्या रेकॉर्डमध्ये तिचे नाव आढळले होते.
नवऱ्यावरील मुख्य आरोप
या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी लक्ष घालत भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींवर मुख्य आरोप जसे की, कागदपत्रांचे फेरफार करणे, बनावट कागदपत्रे बनवून देणे, दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा गैरवापर करून खोटी माहिती देऊन त्याचे कागदपत्रे वापरणे, या गुन्ह्याचा यामध्ये समावेश होतो.
हे ही वाचा : बहिणीने हिंदू मुलाशी लग्न केलं, शकील खानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, काय केलं?
हॉटेल व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान हॉटेलमध्ये खोली पती-पत्नीच्या नावावर बुक करण्यात आली होती. तपासादरम्यान, हॉटेलमध्ये आधारकार्ड जमा करण्यात आले असता, संबंधित धारकार्ड बनावट निघाले. त्याच्यावर पत्नीचा फोटो दिसत होता, मात्र ते सरकारी कागदपत्र नव्हतं. पतीने आपल्या बायकोची ओळख लपवण्याच्या नावाने आपल्याच पत्नीच्या नावाचे बनावट कागदपत्र वापरले. अंतिमस्थितीत सांगितले की, हा केवळ कौटुंबीक किंवा वैवाहिक वाद नसून सरकारी ओळखपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतो.
ADVERTISEMENT











