शाळेतून घरी येताना 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेचे डोळे काढून उसाच्या शेतात आढळला मृतदेह

Lakhimpur crime news : एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. नंतर तो मृतदेह उसाच्या शेतात छिन्नविछिन्न परिस्थितीत आढळून आला होता, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुलगी शाळेतून घरी परतताना ती घरी पोहोचलीच नाही. एवढंच नाही,तर त्या मुलीचे डोळे देखील काढून नेले होते, अशी माहिती समोर आली.

crime news

crime news

मुंबई तक

12 May 2026 (अपडेटेड: 12 May 2026, 03:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीवर अत्याचार करून हत्या

point

मृतदेह उसाच्या शेतात आढळला

point

डोळे काढून नेल्याचा प्रकार

UP Crime News : उत्तर प्रदेशातील लखीमापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. नंतर तो मृतदेह उसाच्या शेतात 13 वर्षीय छिन्नविछिन्न परिस्थितीत आढळून आला होता, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुलगी शाळेतून घरी परतताना ती घरी पोहोचलीच नाही. उशीर झाल्यानंतर कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र पोलिसांनी तक्रारच नोंदवली नव्हती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : NCP च्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना डच्चू? पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांची पोस्ट

मुलीचे डोळे काढून घेतल्याची गावकऱ्यांची माहिती 

दुसऱ्या दिवशी मुलीचा छिन्नविछिन्न मृतदेह गावकऱ्यांना शेतात आढळून आला होता. नंतर तेव्हा मुलीचे डोळे काढून घेतले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तक्रार दाखल करून घेतली. 

संबंधित प्रकरणात लखीमपूर पोलीस अधीक्षक गणेश प्रसाद साहा यांनी चौकीवर पोहोचून परिसराची पाहणी केली आणि तीन पथके तपासासाठी तयार केली. पीडितेच्या आईने दावा केला की, 'पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला'. त्या म्हणाल्या की, 'जर पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवली असती, तर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीला वाचवता आले असते'. 

हे ही वाचा : Astrology : शक्तिशाली धन योगामुळे, 'या' राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार

मुलीला मारहाण करत ठार केले

एसपी म्हणाले की, प्राथमिकदृष्ट्या दिसून आले की, 'मुलीला मारहाण करत ठार करण्यात आले. तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा देखील दिसून आल्या. परंतु शवविच्छेदनानंतर सत्य समोर आले. आम्ही निगराणी पथके आणि नजीकच्या पोलिसांना याबाबत माहिती देत पथके तैनात केली. या प्रकरणाचे सत्य उघडकीस आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि लोकांची चौकशी करण्यात आली'.