रिटायर झाला अन् प्रेग्नंट मुलीसह सगळं कुटुंबच संपवलं, हादरवून टाकणारी घटना

Jamshedpur Crime News: एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह गर्भवती मुलगी आणि मुलाची निर्घृण हत्या केली आहे. या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

12 May 2026 (अपडेटेड: 12 May 2026, 02:56 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रिटायर झाला अन् प्रेग्नंट मुलीसह सगळं कुटुंबच संपवलं

point

हादरवून टाकणारी घटना

Jamshedpur News : एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह गर्भवती मुलगी आणि मुलाची निर्घृण हत्या केली आहे. ही थरारक घटना झारखंडमधील जमशेदपूरच्या ॲग्रिको परिसरात सोमवारी (11 मे) सकाळी घडली. या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

निवृत्त झाला अन्..

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख रवींद्र प्रसाद सिंह अशी झाली असून, तो याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका स्टील कंपनीतून निवृत्त झाला होता. रवींद्रच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी (11 मे) सकाळी हा वाद टोकाला गेला आणि रागाच्या भरात त्याने आपल्याच कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 55 वर्षीय पत्नी सरिता सिंह, 31 वर्षीय मुलगी सुप्रिया सिंह आणि 30 वर्षीय मुलगा रविशेख कुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

हे ही वाचा : 'चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?..' राज ठाकरेंचा मोदींना सवाल, नेमकं काय म्हणाले?

रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह

पूर्व सिंगभूमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पीयूष पांडे यांनी सांगितले की, आरोपीने कुऱ्हाड आणि हातोड्याने वार करून तिघांची हत्या केली. मृत मुलगी सुप्रिया ही गर्भवती असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक ॲग्रिको येथील कंपनी क्वार्टरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना घरामध्ये तिन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड आणि हातोडा जप्त केला आहे.

हे ही वाचा : NCP च्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना डच्चू? पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांची पोस्ट

मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे नाटक

एएसपी ऋषव त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा आरोपीची पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती. आरोपी रवींद्र सिंह याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे नाटक करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या नृशंस हत्याकांडामुळे स्थानिक नागरिक पूर्णपणे हादरले आहेत.