दहिसरच्या इमारतीला भीषण आग, महिलेचा आगीत होरपळून मृत्यू, जखमींची संख्या आली समोर...

Mumbai Dahisar Fire : दहिसरमध्ये एका उंच इमारतीच्या 24 व्या मजल्याला भीषण आग लागली. या आगात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित गंभीर प्रकरण पाहता, घटनास्थळी असलेल्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली.

Mumbai Dahisar Fire

Mumbai Dahisar Fire

मुंबई तक

08 Sep 2025 (अपडेटेड: 08 Sep 2025, 11:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दहिसरमध्ये एका इमारतीच्या 24 व्या मजल्याला भीषण आग

point

एका महिलेचा मृत्यू

Mumbai Dahisar Fire : दहिसरमध्ये एका इमारतीच्या 24 व्या मजल्याला भीषण आग लागली. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित गंभीर प्रकरण पाहता, घटनास्थळी असलेल्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि रहिवाशांना वाचवण्यात यश मिळवता आले. ही घटना 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे. या घटनेनं दहिसरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल

आगीत होरपळून महिलेचा मृत्यू 

या आगीत होरपळलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, नंतरची परिस्थितीत पाहता, तिचा मृत्यू झाला. एका दिव्यांग प्रवाशाची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. तर इतर काही रुग्णालयात काहींना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु  आहेत.

या प्रकरणात दहिसर पोलिसांनी रुग्णालयातील जखमींच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण माहिती गोळा केली. अधिकाऱ्यांनी आगीच्या कारणाचा तपास सुरू केला. वेळेवर बचावकार्यामुळे मोठी जिवीतहानी टळली, परंतु जखमींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

आगीचं कारण आलं समोर 

प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिकांनी सांगितलं की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत आहे. आग लागताच लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे पथक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आणि आता सध्या काही अंशी परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्याचं बोललं जातंय.

हे ही वाचा : लव्ह सेXX आणि धोका, लग्नाचं आमिष दाखवलं, नंतर सलग सात वर्षे लैंगिक शोषण, गर्भपात अन् ...

दरम्यान, आज तक या वृत्तमाध्यमाने दरवर्षी मुंबईत किती लोक आगीने मृत पावले आहेत याची माहिती समोर आली आहे. 2021  4065 मुंबईत आगीच्या घटना झालेल्या आहेत. तर यंदाच्या वर्षी मुंबईत 19 जणांचा मृत्यू झाला होता. तर 173 जण जखमी झाले होते. 2022 मध्ये आगीच्या घटनात वाढ झाली असता, मृतांच्या आकड्यात घट झाली होती. 

 

    follow whatsapp