Crime News : एका तरुणाची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली आहे. त्या हत्येमागचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. एका तरुणाने 220 रुपये परत न केल्याच्या रागातूनच तरुणाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच तरुणाची हत्या झाल्याचं सांगण्यात येतंय. ही घटना बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील रघुवंशी पोलीस ठाणे परिसरातील आहे. मृत तरुणाचे नाव अशोक राय (वय 53) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लालबागच्या राजाच्या विसर्जनाचं कंत्राट गुजरातला, कोळी बांधवांकडून नाराजीचा सूर, म्हणाले 'गुजरातचा तराफा आल्याने...'
नेमकं काय घडलं?
मृत व्यक्तीचा मुलगा राम कुमारने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून, रघुवंशनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुटुंबातील सदस्यांच्या दिलेल्या म्हणण्यानुसार, महिमखंड नवतोलिया गावातील रहिवासी थेली साह यांचे किराणा वस्तूंचे दुकान आहे. त्याच गावातील रहिवासी अशोक राय यांना दुकानदाराचे केवळ 220 रुपये देणं होतं.
शनिवारी संध्याकाळी अशोक राय तंबाखू खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. दुकानदार थेली साह याने अशोक राय यांच्यावर थकलेले पैसे भरण्यासाठी दबाव आणला गेला होता. अशातच दोघांमध्ये मोठा वाद सुरु झाला होता. याच थकबाकीमुळे अशोक राय यांना मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
तीन आरोपी फरार
या संदर्भात रघुवंशनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिशुपाल कुमार म्हणाले की, या प्रकरणात एका आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले. दुकानदारासह इतर तीन आरोपी हे फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थ्याला घेऊन जायचा बाथरूममध्ये, नंतर चुंबन घेत प्रायव्हेट पार्टसोबत नको तेच...
संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, दुकानदार आणि ग्राहकांमधील वादातून हत्येचा गुन्हा झाल्याचं दिसून आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणातील हत्येचा गुन्हा उघडकीस आला. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
