Crime News: उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका विवाहित पुरुषाने गावातील दुसऱ्याच महिलेसोबत लग्न करून घरी आणलं. पतीने दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न केल्याचं पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. पीडित पत्नी त्यावेळी सासरीच होती. मात्र, पत्नीने पतीला त्याच्या अशा कृत्याबद्दल जाब विचारला असता, आरोपी तरुण पत्नीलाच दोषी ठरवू लागला. पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे, सासरच्या घरी कोणीच तिला मदत केली नाही. याउलट, सगळे तिलाच दोषी ठरवू लागले. यानंतर, ती तिच्या माहेरी गेली.
ADVERTISEMENT
महिलेकडून 1 लाख रुपये रोख आणि बाइकची मागणी
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि पतीने दुसरं लग्न केल्याच्या आरोपाखाली महिलेच्या सासरच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणासंबंधी पोलिसांनी सांगितलं की खजुरी गावात राहणाऱ्या सविता पाठक नावाच्या महिलेने बुधवारी (3 सप्टेंबर) छपिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. रिपोर्टनुसार, तिचा विवाह याच वर्षी रंजीत तिवारी नावाच्या तरुणासोबत झाला होता. लग्नानंतर, महिलेचा पती, तिची सासू, जाऊ, दीर आणि नणंद यांनी महिलेकडून 1 लाख रुपये रोख आणि बाइकची मागणी केली. यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला.
हे ही वाचा: शीना बोरा मर्डर केसमध्ये 10 वर्षानंतर महत्त्वाच्या साक्षीदाराचा खळबळजनक खुलासा! इंद्राणी मुखर्जीला अडकवण्यासाठी...
गावातील तरुणीसोबत संबंध प्रस्थापित...
पोलिसांच्या माहितीनुसार, या काळात रंजीतने छपिता पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या एका गावातील तरुणीसोबत संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला. 27 जून रोजी पती तिच्या प्रेयसीला घेऊन घरी आला. त्यानंतर, रंजीतने त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने गुप्तपणे प्रेयसीसोबत लग्न केलं.
सासरच्या मंडळींनी दिली जीवे मारण्याची धमकी
पोलिसांच्या मते, पीडितेने पतीच्या या कृत्याला विरोध केला असता सासरच्या लोकांनी तिला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. सासरच्या लोकांनी हुंडा न दिल्यामुळे तिला नको ते बोलले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पीडित महिलेने सांगितलं. त्यानंतर, 31 ऑगस्ट रोजी महिलेने माहेरच्या लोकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यासंबंधी तक्रार दाखल केली. मात्र, आरोपींच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: GR तर निघाला, पण मराठ्यांना कसे मिळणार कुणबी दाखले? टेन्शन घेऊ नका, 'ही' बातमी पाहा!
पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पती रंजीत तिवारी याच्यासह त्याच्या कुटुंबातील सहा सदस्यांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
