sexually abused : प्रेमात विश्वास असणं खूप गरजेचं असतं. पण हल्लीच्या प्रेमीयुगुलांच्या नात्यात प्रेमाची कमतरता दिसून येते. केवळ प्रेमाचं नाटक करून काही लोक शरीरसुख मिळवतात. तसेच अनेकजण तर प्रेमाचं आमिष दाखवता, पण जेव्हा विवाहाची वेळ येते तेव्हा यु टर्न घेतात. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे. बिहारमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे एक-दोन वर्षे नाही,तर तब्बल 7 वर्षे लैंगिक शोषण केलं आहे. त्यानंतर त्या तरुणीचा गर्भपात झाला आणि आरोपीने दुसऱ्याशीच विवाह केल्याची ही घटना बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 17 सप्टेंबरपासून बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल
नेमकं काय घडलं?
लाईव्ह हिंदुस्तान या वृत्तमाध्यमानुसार, संबंधित प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तिला पाटण्याहून मोतिहारी येथे बोलावण्यात आले. तिथेच आरोपीने तिच्या आई आणि वडिलांनाही शिवीगाळ केली. पीडितेनं आरोप केला की, आरोपीने लग्नासाठी तिच्याकडून तब्बल 50 लाख रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर तिने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्याचे प्रभारी राजीव रंजन म्हणाले की, अर्जाच्या अधारे एफआरआय दाखल करण्यात आला. आरोपी सुमन तिवारीला अटक करत तुरुंगात डांबण्यात आले.
हे ही वाचा : “मधल्या सुट्टीत सरांनी माझ्यासोबत...” चौथीमधील विद्यार्थिनीसोबत शिक्षकांनं केलं नको ते!
घटनेची पुनरावृत्ती
अशीच एक घटना आता कल्याणपूर येथे उघडकीस आली आहे. एका तरुणाने एका महिलेचे गेली तीन वर्षांपासून लैंगिक शोषण केलं. या गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणात आरोपीच्या पीडितेच्या जाऊबाईने पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली की, ती दीराच्या पत्नीला विरोध करूनही गाडीवर जबरदस्ती बसवायचा आणि घेऊन जायचा. आरोपीचं नाव शशिकांत असे आहे. तसेच अनेकदा जातिसूचक शिवीगाळही करायचा, असा आरोप आहे.
ADVERTISEMENT
