Indian Navy Sailor Death : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये एका 30 वर्षीय भारतीय नौदल खलाशासह त्याच्या पत्नी आणि दोन लहान मुलांचे मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली. प्राथमिक अंदाजानुसार, या खलाशाने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, तर त्याच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
एकाच घरात चार मृतदेह
कफ परेड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुरणमल शंभूलाल मेहरा (वय 30), त्यांची पत्नी ओमा मेहरा (वय 28), त्यांचा तीन वर्षांचा मुलगा यश आणि दोन महिन्यांची मुलगी अशी या मृत कुटुंबाची नावे आहेत. पोलिसांना घरात पुरणमल यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला, तर त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पलंगावर पडलेले होते. या ठिकाणी कोणतीही 'सुसाईड नोट' किंवा आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारी चिठ्ठी पोलिसांना सापडलेली नाही.
हे ही वाचा : बायको बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती, नवऱ्यानं पकडलं अन् भररस्त्यात राडा
अपघाती मृत्यूची नोंद
या घटनेनंतर कफ परेड पोलिसांच्या मोबाईल युनिटद्वारे चारही मृतदेह मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पंचनामा पूर्ण झाला असून सध्या शवविच्छेदन (पोस्टमार्टम) सुरू आहे. या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली असून, या मृत्यूंमागील परिस्थितीचा पोलीस कसून तपास करत आहेत.
हे ही वाचा : मुलीला आई बॉयफ्रेंडसोबत 'तसल्या' अवस्थेत दिसली, वडिलांना सांगणार इतक्यात...
भारतीय नौदलाचा दुजोरा
दरम्यान, भारतीय नौदलाने या दुःखद घटनेला दुजोरा दिला आहे. नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, '15 ऑगस्ट 2026 रोजी कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये एका अत्यंत दुर्दैवी घटनेत भारतीय नौदलाचा एक खलाशी, त्याची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले आहेत.' या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, भारतीय नौदल या तपासात सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करत असल्याचेही नौदलाने स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












