Mumbai News : मुंबईतील लोकल म्हणजे प्रवाशांचा जीव की प्राणच. दररोज नोकरदार वर्ग या रेल्वेनं तासन् तास प्रवास करताना दिसतो. अनेकदा या लोकलमध्ये हाणामारी झालेले अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. मग त्या पुरुषांच्या डब्यात असोत किंवा महिलांच्या डब्यात. हाणामारी ही प्रवाशांसाठी सामान्य बाब ठरली आहे. मात्र, एका पुरुषाने एका महिलेला बसण्याच्या जागेवरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
हेही वाचा : Pune Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेट कारची काच तोडून...
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. या लोकलमध्ये एका महिलेला पुरूषाने मारहाण केली आहे. ही मारहाण जागेवरून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावणारी लज्जास्पद घटना घडली आहे. पुरूषाने महिलेला बेदम मारहाण केल्याने त्या डब्यात एकच गोंधळ उडाला आहे.
हा प्रकार सुरू असताना काही प्रवाशी हे बघ्याची भूमिका घेत होते. तर एका प्रवाशाने मारहाण करणाऱ्या पुरुषाला शांत राहण्यास सांगितलं आहे. यामुळे आता प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रशासनाकडे पुरुषावर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा : Pune Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेट कारची काच तोडून...
दरम्यान, मारहाणीच्या प्रकरणात जे प्रवाशी बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. तसेच पुरुषावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी आता प्रवाशांनी केली आहे. अशा परिस्थितीत महिला लोकलमध्ये सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
महिलेला मारहाण करण्यात आलेला व्हिडिओ मोठ्या प्रामाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ही घटना कधी घडली? या घटनेचा वेळ आणि काळ सांगता येणार नाही.
ADVERTISEMENT
