पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या 'त्या' महिलेला अटक, पोलिसांनी मध्यरात्री... प्रकरण काय?

Nagpur Crime News : अवैधपणे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेला आता अटक करण्यात आली आहे. या याचिकेवर पहाटे अडीच वाजता नागपूरच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली होती. दंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण घेतला. यानंतर पोलिसांनी महिलेला तात्काळपणे अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

Nagpur Crime News 'That' woman from Nagpur who went to Pakistan arrested

Nagpur Crime News 'That' woman from Nagpur who went to Pakistan arrested

मुंबई तक

• 12:29 PM • 29 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अवैधपणे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेला आता अटक

point

याचिकेवर पहाटे अडीच वाजता नागपूरच्या न्यायालयात सुनावणी

Nagpur Crime News : अवैधपणे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेला आता अटक करण्यात आली आहे. या याचिकेवर पहाटे अडीच वाजता नागपूरच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली होती. दंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण घेतला. यानंतर पोलिसांनी महिलेला तात्काळपणे अटक करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरणाची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सूर्य आणि गुरु ग्रहांच्या युतीमुळे 'या' राशींचे लोक होणार मालामाल

या प्रकरणात ऑपरेशन सिंदूर सुरु असताना सुनीता गटलेवार (वय 43) एका ख्रिश्चन धर्मगुरूला कायद्याचं उल्लंघन करून पाकिस्तानात भेटायला निघून गेली होती. दरम्यान, सुनीता गटलेवार यांना पहाटे अटक करण्यात आली आहे. भारताच्या कायद्यानुसार, कोणत्याही महिलेस सायंकाळी किंवा रात्री अटक करता येत नसल्याने त्यांना सूर्योदयापूर्वी अटक करण्यात आली. 

पाकिस्तानात जाण्यामागचं नेमकं कारण काय?

या अटकेनंतर महिला ही पाकिस्तानात जाण्यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित राहत होता. ज्यात ती अनेकदा पाकिस्तानात असणाऱ्या एका धर्मगुरूसोबत मोबाईलद्वारे चॅट करत होती. याबाबतची माहिती अटकेनंतर समोर आली आहे. 

जम्मू काश्मीरमधील कारगिलजवळच्या हुंदरमन गावानजीकच्या परिसरापासून असणाऱ्या एलओसी सीमा पार करुनच महिला पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकांनी मध्यरात्रीच्या सुमारास न्यायाधीशांच्या घरी तिला हजर करण्यात आले. 

हेही वाचा : नांदेड हादरलं! अचानक पूर आला आणि माय-लेकीसह भाची वाहून गेली, दीड किलोमिटर दूर...

12 वर्षाचा मुलाला हॉटेलमध्ये सोडलं

पाकिस्तानात जाण्यापूर्वी तिने आपल्या 12 वर्षांच्या मुलाला एका कारगिलमधील एका हॉटेलमध्ये सोडलं होतं. दरम्यान ते मुल हे एका कारगिलच्या बालकल्याण समितीच्या ताब्यात होते. बालकल्याण समितीने त्याच्या कुटुंबियांशी बोलून त्याला त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे. 


    follow whatsapp