एक्सप्रेसवेवर महिला आणि नेता न्यूड अवस्थेत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

मुंबई तक

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 10:13 AM)

Manoharlal Dhakad Viral Video : भाजपचा निकटवर्तीय असणारा नेता मनोहरलाल धाकडचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manoharlal Dhakad Viral Video Update

Manoharlal Dhakad Viral Video Update

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोहरलाल धाकडचा व्हिडिओ व्हायरल

point

व्हिडिओबाबत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Manoharlal Dhakad Viral Video : भाजपचा निकटवर्तीय असणारा नेता मनोहरलाल धाकडचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडिओत नेता विवस्त्र नाचताना दिसत असल्याची माहिती काही वृत्त माध्यमांनी दिली आहे. त्याच नेत्यासोबत एक महिला देखील आहे. हा व्हिडिओ मुंबई - दिल्ली महामार्गावरील असून प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : "नोकरी गेली, आधार नाही, समाजाची भीती...", महिलेला उच्च न्यायालयाने दिली गर्भपात करण्याची परवानगी

व्हिडिओबाबत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील संबंधित व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. @Aarushi नावाच्या एका नेटकऱ्याने लिहिलं की, तुम्ही तिला ओळखता का? तसेच रामू कुशवाहा आणि भानू नंद यांनी दावा केला की, हा मनोहरलालच आहे. या व्हिडिओचे मिम्स व्हायरल होत आहेत. तसेच कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

युपी तक या वृत्तमाध्यमाने सांगितलं की, व्हायरल व्हिडिओची चौकशी केली असता, संबंधित व्हिडिओ मनोहरलाल धाकडच्या कुटुंबियांना पाठवला. तेव्हा त्यांनी हा व्हिडिओ मनोहरलालचा नसल्याचं सांगितलं. व्हिडिओत मनोहरलाल सारखच कुणी तरी दिसतंय असं त्यांनी सांगितलं. जून 2025 मध्ये मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे वर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत नेता आणि महिला अश्लील चाळे करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : "नोकरी गेली, आधार नाही, समाजाची भीती...", महिलेला उच्च न्यायालयाने दिली गर्भपात करण्याची परवानगी

नेत्याबाबत भाजपचा दावा

या प्रकरणात नेता मनोहरलाला धाकडचं नाव समोर आलं आणि त्यांना अटक झाली. या प्रकरणात भाजपने दावा केला की, मनोहरलाल धाकडचा आमची पक्षाशी काहीही संबंध नाही. त्यावेळी त्यांना जमीन मिळाला असून पोलिस महिलेच्या शोधात असल्याची माहिती युपी तक या वृत्त माध्यमाने दिली आहे.