Crime News: पैसे कमवण्यासाठी 'निंजा टेक्निक'चा वापर करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची बातमी समोर आली आहे. या टोळीतील सदस्य सणासुदीच्या काळात, विशेषत: दारू विकत घेण्यासाठी बनावट नोटा छापायचे आणि त्यांचा बाजारात वापर करायचे. या नोटा पाहून त्या खोट्या किंवा नकली असतील, याचा अंदाजच लावता येत नव्हता. संबंधित प्रकरण दिल्लीमधील असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
पाच ते सहा वर्षांपासून नकली नोटा छापण्याचं काम...
खरं तर, या प्रकरणातील आरोपी लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांवर असलेल्या हिरव्या पट्ट्यांचा वापर करायचे. आरोपी तरुण त्या हिरव्या पट्ट्या नकली नोटांवर चिकटवायचे, जेणेकरून त्या खऱ्या वाटतील. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून त्यामधून विवेक मौर्य आणि रवी नावाच्या तरुणांच्या अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मागील पाच ते सहा वर्षांपासून अशा पद्धतीने बनावट नोट छापायचे.
एक प्रिंटर आणि स्टॅम्प पेपर सारख्या शीटचा वापर
नकली नोटा बनवण्यासाठी आरोपी विवेक एक प्रिंटर आणि स्टॅम्प पेपर सारख्या शीटचा वापर करायचे. या एकाच शीटवर दोन नोटा एकत्र छापल्या जायच्या. इतकेच नव्हे तर, या बनावट नोटांवर हिरव्या रंगाची पट्टी आणि महात्मा गांधीजींचा फोटो सुद्धा असायचा, त्यामुळे या नोटा अगदी खऱ्या वाटायच्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक एका दिवसात जवळफास 40 नोटा छापायचा. खरं तर, आरोपी मौर्यला यापूर्वी सुद्धा एका गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून तो एप्रिल महिन्यातच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता नागरिकांना मिळणार वीज कंपनी निवडण्याचा पर्याय! मुंबईच नव्हे तर 'या' शहरांमध्ये सुद्धा होणार उपलब्ध...
सणासुदीच्या काळाचा फायदा...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवीवर खूप कर्ज होतं. दोन वर्षांपूर्वी तो एका गुन्ह्याच्या आरोपाखाली तुरुंगात असताना त्याची विवेकसोबत ओळख झाली. त्यानंतर, दोघांनी मिळून गुन्हा करण्याचं ठरवलं. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी सुद्धा मौर्यला यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी अनेकदा अटक केली होती. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी सांगितलं की या टोळीने सणासुदीच्या काळाचा फायदा घेत सप्टेंबर महिन्याच्या आसपास नकली नोटा छापण्याचं प्रमाण वाढवलं होतं.
हे ही वाचा: ब्राझीलची मॉडेल ते मतचोरी राहुल गांधींचे पुराव्यांसह सनसनाटी आरोप, आता निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
रवी आणि विवेकने यावर्षीच एप्रिल ते जुलै दरम्यान दिल्लीच्या विजय नगर परिसरातील एका भाड्याच्या घरात सात लाख रुपयांच्या किंमतीच्या नकली नोटा छापल्या होत्या. मात्र, घरमालकाला भाडेकरूंवर संशय आल्याने आरोपींना दिल्लीतील ते घर सोडावं लागलं आणि नंतर, दोघांनी शाहजहांपूर येथे रवीच्या घरी नकली नोटा छापण्याचं काम सुरू केलं. आता तपासादरम्यान, पोलिसांनी रवीच्या घरातून बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सध्या, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











