आता अतीक अहमदच्या बायकोसाठी ‘हा’ खास प्लॅन, यावेळी वाचणं कठीण?

मुंबई तक

18 Apr 2023 (अपडेटेड: 18 Apr 2023, 02:52 PM)

wife of Atiq Ahmed: पोलिसांच्या ताब्यात असतानाच थेट डोक्यात गोळी घालून हत्या केलेल्या अतीक अहमदच्या पत्नीचा आता पोलीस कसून शोध घेत आहेत. तिच्यावर 50 हजारांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे.

special plan is ready for atiq ahmeds wife shaista this time it is difficult to escape from police

special plan is ready for atiq ahmeds wife shaista this time it is difficult to escape from police

follow google news

Umesh Pal Murder Case: उमेश पाल खून प्रकरणानंतर फरार असलेली माफिया डॉन अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिच्या शोधासाठी यूपी पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून तिच्यावर 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपी पोलिसांना शाइस्ता कौशांबी, ग्रेटर नोएडा, मेरठ, दिल्ली, ओखला, मुंबई आणि पश्चिम बंगालमध्ये यापैकी एका ठिकाणी लपल्याचा संशय आहे. त्याचवेळी आता पोलीस शाईस्ताला पकडण्यासाठी या भागात छापे टाकत आहेत.

हे वाचलं का?

पोलिसांना शाईस्ताला मदत केल्याच्या संशय

पोलिसांनी शाइस्ताला मदत केल्याचा संशल असलेल्या 20 हून अधिक लोकांची ओळख पटवली आहे, ज्यांच्याकडून तिला मदत मिळू शकते. यामध्ये प्रयागराज येथील अकामा बिल्डर्सचे मालक मोहम्मद मुस्लिम, अस्लम मंत्री, खालिद जफर, मो नफीस, इर्शाद उर्फ ​​सोनू, अर्शद, सुलतान अली, नूर, रशीद उर्फ ​​नीलू, आवेज अहमद, नजमे आलम उर्फ ​​नब्बे, मो आमिर उर्फ ​​परवेज, मो. मनीष खन्ना, नायब, ताराचंद गुप्ता, मो अनस आणि आसिफ उर्फ ​​मल्ली यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय शाइस्ताच्या जवळची एक महिला डॉक्टरही आहे. तसेच शाईस्ताची एक मेहुणी आणि बनारसमध्ये राहणारा अतिकचा मेहुणा देखील शाइस्ताच्या अगदी जवळचा असल्याचे सांगितले जाते. शाइस्ता अनेकदा लखनऊमध्ये त्याच्या घरी राहायची आणि आता पोलीस तिचीही चौकशी करत आहेत.

हे ही वाचा>> अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?

मुलाचा एन्काउंटर तर पतीचा कॅमेऱ्यासमोरच निर्घृण खून

उल्लेखनीय आहे की, शनिवार 15 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमध्ये एक मोठी घटना घडली होती. यावेळी माजी खासदार आणि माफिया अतिक आणि त्याचा धाकटा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलीस दोन्ही भावांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली होती.

हे ही वाचा>> अतिक अहमद, अशरफची हत्या करणारे आहेत ‘कुख्यात’, अशी आहे गुन्हेगारी ‘कुंडली’

विशेष म्हणजे ज्या दिवशी त्याचा तिसरा मुलगा असद याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच दिवशी अतिकची हत्या करण्यात आली होती. प्रत्यक्षात उमेश पाल हत्येप्रकरणी फरार असलेला इनामिया असद हा फरार होता, ज्याचा 13 एप्रिल रोजी झांशीमध्ये यूपीएसटीएफने चकमकीत ठार केलं होतं.

पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की.. शाइस्ता स्मशानभूमीत येऊ शकते जेव्हा अतिकवर कब्रिस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. मात्र अद्यापही तरी तसं काहीही झालेलं नाही. त्यामुळे शाइस्ता ही अद्याप तरी पोलिसांपासून बरीच दूर आहे.

    follow whatsapp