बाप बलात्कार करायचा म्हणून घर सोडलं; 19 वर्षाच्या मुलीनं सांगितली हादरवून टाकणारी कहाणी, 'असं' बाहेर आलं प्रकरण

मुंबई तक

• 04:48 PM • 04 Feb 2026

Crime News : बायको चार वर्षांपासून आजारी असल्यानं एका नराधमानं पोटच्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा नराधम बाप गेल्या चार वर्षांपासून आपल्याच मुलीवर अत्याचार करत होता. प्रतिष्ठेच्या भीतीनं पीडित मुलगीही ते सहन करत राहिली. शेवटी यापासून सुटका करुन घेण्याच्या उद्देशानं तिनं घर सोडलं. यानंतर बापानं मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला शोधलं खरं, पण चौकशीवेळी वेगळाच प्रकार समोर आल्यानं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाप बलात्कार करायचा म्हणून घर सोडलं

point

19 वर्षाच्या मुलीनं सांगितली दुर्दैवी कहाणी,

Crime News : बायको चार वर्षांपासून आजारी असल्यानं एका नराधमानं पोटच्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा नराधम बाप गेल्या चार वर्षांपासून आपल्याच मुलीवर अत्याचार करत होता. प्रतिष्ठेच्या भीतीनं पीडित मुलगीही ते सहन करत राहिली. शेवटी यापासून सुटका करुन घेण्याच्या उद्देशानं तिनं घर सोडलं. यानंतर बापानं मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला शोधलं खरं, पण चौकशीवेळी वेगळाच प्रकार समोर आल्यानं पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'कोरियन गेम'च्या नादात तिघींनी गमावला जीव; मधल्या बहिणीबद्दल धक्कादायक माहिती आली समोर...

चार वर्षांपासून अत्याचार

गुजरातमधील या घटनेनं सगळेजण हादरुन गेले आहेत. या घटनेची सुरुवात झाली चार वर्षांपूर्वी. पीडितेची आई चार वर्षांपूर्वीच घरात अंथरुणाला खिळली होती. तेव्हा पीडितेचं वय १५ वर्ष होतं. याचा गैरफायदा नराधम बापानं उचलला. आपल्या पोटच्या मुलीलाच त्याने वासनेची शिकार बनवलं. जेव्हा-जेव्हा तो मुलीवर अत्याचार करायचा तेव्हा-तेव्हा तो घरातील टीव्हीचा आवाज वाढवायचा. तब्बल ४ वर्ष पीडिता हा प्रकार सहन करत राहिली. समाजाचं भय, प्रतिष्ठा यामुळं तिनं आपल्या नराधम बापाविरुद्ध कुठं ब्रदेखील काढला नाही. शेवटी तिनं या नरक यातनेतून एक धाडसी निर्णय घेतला. 

सुटका करुन घेण्यासाठी घरच सोडलं

वयाच्या १५ व्या वर्षापासून ते १९ व्या वर्षापर्यंत पीडितेने आपल्या नराधम बापाचा अत्याचार सहन केला. यातून बाहेर पडण्यासाठी तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. शेवटी मोकळा श्वास घेण्यासाठी तिनं घर सोडलं. तिनं घर सोडल्यानंतर इकडं नराधम बापाची घाबरगुंडी उडाली. त्याने पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी वेगानं तपासाची चक्रं फिरवली आणि मुलीला शोधून काढलं. पण चौकशी दरम्यान, मुलीनं जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

हे ही वाचा : आजीचा नीट उपचार केला नाही; नातवाने दवाखान्यातच डॉक्टरला संपवलं अन् पोलिसांकडे जाऊन... पुढं काय घडलं?

आरोपी बाप आहे दिव्यांग

पोलिसांनी मुलीची चौकशी सुरु केली. यावेळी तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिचा नराधम बाप गेल्या चार वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. प्रतिष्ठेच्या भीतीनं ती गप्प बसली. शेवटी या सगळ्याला कंटाळून तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी बाप दिव्यांग आहे. त्याच्यावर बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.