वकिलाने न्यायालयातच लोखंडी गजाला शालेनं घेतला गळफास, कर्मचारी जेवणाचा डब्बा घेऊन आले अन्...सुसाईड नोटबाबत पोलिसांचं मौन

parbhani suicide : परभणीत न्यायालयाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सुसाईड नोटबाबत मौन बाळगल्याची माहिती समोर आली आहे.

parbhani crime lawyer committed suicide in court

parbhani crime lawyer committed suicide in court

मुंबई तक

• 12:42 PM • 21 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी वकिलाने शालेनेच घेतला गळफास

point

पोलिसांनी सुसाईड नोटविषयी बाळगलं मौन

point

नेमकं काय झालं?

Parbhani Suicide : परभणी जिल्ह्यात एका सरकारी वकिलाने शालेनेच आपल्या न्यायालयाच्या एका खिडकीच्या लोखंडी गजाला गळफास लावत आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली आहे. सरकारी वकिलाचे नाव व्ही. एल. चंदेल असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परभणीतील इंदेवाडी गाव शोकाकुल झाले आहे. संबंधित प्रकरणाची सुसाईड नोट पोलिसांकडे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं याची माहिती पोलीस देत नसल्याचं समजतंय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात

नेमकं काय घडलं? 

व्ही. एल. चंदेल हे जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून परभणीतील वडवणी येथील न्यायालयात रुजू झाले होते. ते बुधवारी सकाळी 10 वाजता न्यायालयात आले असता, त्यांनी 10. 30 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. कर्मचारी जेवणाचा डब्बा घेऊन आल्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. यानंतर, वडणवी पोलिसांसह अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. तेव्हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी स्थानिक आरोग्य केंद्रात पाठवला. 

पोलिसांकडून सुसाईड नोट देणं टाळलं 

दरम्यान, वकिलांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.  ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. याच सुसाईड नोटमध्ये वकिलाने आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं. पण, वडवणी पोलिसांकडे सुसाईड नोटची विचारपूस केली असता, त्यांनी सुसाईड नोट देणं टाळलं, अशी माहिती काही वृत्तमाध्यमांनी दिली आहे.  

हे ही वाचा : रात्र पाळीवरून पती आला घरी, बायको दीरासोबत रंगात आली, पतीनं विचारला जाब अन् भावानेच डोक्यात...

पोलिसांनी मृतदेहाच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याचं सांगितलं. मात्र, त्यावर आताच बाष्य करणं गरजेचं नाही, असं सांगितलं. यामुळे वकिलांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp