Nagpur Shocking Viral News : नागपूर शहरात हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. क्राईम ब्रँचने ऑपरेशन शक्तीच्या अंतर्गत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एक महिला अन् तिच्या मुलानं हा बेकायदेशीर धंदा सुरु केला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पोलिसांना एक गुप्त खबर मिळाली की, हुडकेश्वर लेआऊटमध्ये एका घरात देहव्यापाराचा घाणेरडा खेळ सुरु आहे. त्यानंतर क्राईम ब्रॅन्च पोलिसांनी तातडीनं प्लॅन केला. त्यांनी एक नकली ग्राहक तयार केला आणि ऑनलाईन चॅटच्या माध्यमातून या रॅकेटशी संपर्क साधला. त्यानंतर सौदा पक्का झाला. एका तरुणीला पाठवण्यासाठी 1000 रुपये अॅडवान्समध्ये मागितले. ही रक्कम आरोपींकडे पोहोचल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर आरोपी महिला आणि मुलाला पोलिसांनी त्याब्यात घेतलं.
महिला अन् मुलगा चालवत होते रॅकेट
पोलिसांच्या तपासात उघड झालं की, सुनीता विकास कांबले आणि यश विकास कांबले अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांनी जवळपास सहा महिन्यांआधी हे घर भाड्याने घेतलं होतं. ते एका शासकीय विभागाचं काम करतील, असं कारण सांगण्यात आलं होतं. पण त्या ठिकाणी त्यांनी देहव्यापाराचा धंदा सुरु केला. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एका 27 वर्षाच्या तरुणीचीही सुटका केली. ही तरुणी छत्तीसगढ येथील रहिवासी आहे. तिला पैशांचं लालच देऊन नागपूरला आणण्यात आलं होतं आणि या घाणेरड्या धंद्यात ढकललं होतं.
हे ही वाचा >> BEST Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईतल्या निवडणुकीत कशामुळे झाला एवढा दारूण पराभव?
श्रीमंत आणि प्रीमियम ग्राहकांना निशाणा बनवायचे अन्..
पोलिसांनी म्हटलं की, सुनीता आणि यश खूप चालखीने काम करत होते. ते फक्त श्रीमंत आणि प्रिमियम ग्राहकांना निशाणा बनवायचे. व्हाट्सअॅपवर फोटो पाठवला जायचा. त्यानंतर ग्राहक त्यांच्या पसंतीच्या मुलीला अॅडवान्स रक्कम द्यायचे. त्यानंतर सौदा पक्का व्हायचा आणि तरुणीला ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जायचं. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी 94700 रुपयांची सामग्री जप्त केली. यामध्ये 63500 रुपये रोख रक्कम आणि चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी सुटका केलेल्या तरुणीची मेडिकल टेस्ट करण्यात आली. नागपूर पोलीस आयुक्तांनी म्हटलं, ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून अशाप्रकारचे बेकायदेशीर धंदे संपवण्यात येतील. याआधी 14 ऑगस्टलाही पोलिसांनी सीताबर्डी परिसरात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
हे ही वाचा >> घोर कलियुग! 2 मित्रांनी बायकांची केली अदला-बदली..त्यानंतर घडलं भयंकर! पोलिसांनाही बसला हादरा..घडलं तरी काय?
ADVERTISEMENT
