घरी सोडण्याच्या बहाण्याने प्रियकराने जंगलात नेलं अन् मित्रांसोबतच मिळून... हत्येनंतर मृतदेह नाल्यात...

छत्तीगढमधील कोरबा जिल्ह्यात एका प्रियकराने तिच्या प्रेयसीला घरी सोडण्याच्या बहाण्याने जंगलात घेऊन गेला आणि तिथे मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे.

मित्रांसोबतच मिळूनच केला सामूहिक अत्याचार! हत्येनंतर मृतदेह नाल्यात...

मित्रांसोबतच मिळूनच केला सामूहिक अत्याचार! हत्येनंतर मृतदेह नाल्यात...

मुंबई तक

• 11:17 AM • 21 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराने मित्रांसोबत मिळून प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार...

point

प्रेयसीची हत्या केली अन् मृतदेह नाल्यात...

Crime news: छत्तीगढमधील कोरबा जिल्ह्यात एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसोबत घृणास्पद आणि संतापजनक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणातील पीडितेला तिचा प्रियकर त्याच्या गाडीवरून घरी सोडण्यासाठी जात असताना त्याने तिला वाटेतच एका ठिकाणी उतरवलं आणि तिला जंगलात घेऊन गेला. तिथे तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर त्या नराधमांनी मिळून पीडितेची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला. 

हे वाचलं का?

28 जुलै रोजी प्रकरणातील पीडितेने तिच्या प्रियकराला फोन केला आणि म्हणाली, "माझ्याकडे खूप सामान आहे, त्यामुळे मला घरी सोडण्यासाठी मला न्यायला ये." त्यानंतर प्रियकर लगेच तिला  न्यायला गेला. मात्र, प्रियकराकडून लिफ्ट मागणं तिला खूप महागात पडलं. त्याने प्रेयसीला गाडीवर बसवलं आणि तिला घेऊन तो जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. त्यानंतर, आरोपी प्रियकराने त्याच्या प्रेयसीला वाटेतच उतरायला सांगितलं. 

मित्रांसोबत मिळून केला सामूहिक बलात्कार 

त्यानंतर, प्रेयसी काहीही विचार न करता बाइकवरून उतरली. तेवढ्यात प्रियकराचे दोन मित्रही तिथे आले आणि तिघंही पीडितेला जंगलात घेऊन गेले. नंतर त्यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी पीडिता ओरडत त्यांना विनवण्या करू लागली पण, त्या नराधमांनी तिला सोडलं नाही. त्यानंतर पीडिता रडत रडत म्हणाली, "मी सगळं पोलिसांना सांगेन आणि तुम्हा तिघांना तुरुंगात पाठवेन." हे ऐकून आरोपींना तरुणीला बेदम मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिची निर्घृणपणे हत्या केली. 

हे ही वाचा: कल्याण-डोंबिवलीची कहाणी: शिंदे-चव्हाण पुढारी असलेल्या KDMC ची एवढी दैना झाली तरी कशी?

हत्या केली आणि मृतदेह नाल्यात...

हत्येनंतर आरोपींनी तिचा मृतदेह एका पोत्यात टाकला आणि ते पोतं घट्ट बांधून मृतदेह एका नाल्यात फेकण्यात आला. त्या दिवशी, मुलगी बराच काळ घरी न परतल्याने कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली. मुलगी बेपत्ता झाल्याच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. आपली 35 वर्षीय मुलगी रेशन आणण्यासाठी बाहेर गेली आणि ती अजून घरी पोहोचली नसल्याचं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 

हे ही वाचा: BEST Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईतल्या निवडणुकीत कशामुळे झाला एवढा दारूण पराभव?

24 दिवसांनी सापडला सांगाडा

पोलिसांनी या प्रकरणात 45 वर्षीय उमेंद्र प्रसाद बिंझिया नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं. पीडिता शेवटची उमेंद्र सोबत दिसल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर, त्याची चौकशी केली असता सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. तो म्हणाला की त्याने त्याचे दोन मित्र संतराम उर्फ ​​छोटू (28) आणि गुलाम सिंग यांच्यासोबत मिळून आपल्याच प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर त्यांनी तिची हत्या केली. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे, 24 दिवसांनंतर पोलिसांनी पीडितेचा सांगाडा जप्त केला. तिचा मृतदेह पूर्णपणे कुजल्याचं सांगण्यात येत आहे. 

    follow whatsapp