Murder case: मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. येथे पेशाने इंजिनीअर असलेल्या एका पतीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला आणि संतापलेल्या पतीने किचनच्या स्लॅबवर पत्नीचं डोकं आपटून तिची हत्या केल्याची माहिती आहे. त्यानंतर आरोपीने त्याच्या मदतीने पीडितेचा मृतेदह एका चादरीत गुंडाळला आणि दोघेही प्रयागराजला गेले. तिथे जाऊन त्यांनी तो मृतदेह जाळून टाकल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेच्या माहेरच्या लोकांनी त्यांच्या जावयाच्या विरोधात पोलिस ठाण्यात FIR दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या आईला अटक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ही घटना विंध्यनगर पोलिस स्टेशन परिसरात घडली. 15 ऑगस्ट रोजी येथील एनटीपीसी कॉलनीत राहणाऱ्या एका इंजिनीअरने आपल्या पत्नीची हत्या केली. आरोपीचं नाव निखिल दुबे असून तो प्रयागराजमधील मूळ रहिवासी आहे. केवळ पाणी मागितल्याच्या किरकोळ कारणामुळे निखिलचं तिच्या पत्नीशी भांडण झालं. रागाच्या भरात निखिलने त्याच्या पत्नीचं डोकं किचनमधील स्लॅबवर आपटलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
माहेरच्या लोकांना जावयावर संशय
पत्नीचा मृत्यू झाल्याचं पाहून निखिल खूप घाबरला. हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी पतीने त्याच्या आईची मदत घेतली. त्याने त्याच्या पत्नीचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि प्रयागराजमध्ये जाऊन त्याने तो मृतदेह जाळून टाकला. विंध्यनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी सुनील दुबे यांनी फतेहपूरहून त्यांना फोन केला होता. त्यांनी सांगितले की त्यांचा जावई निखिलने त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूची माहिती दिली होती. पीडितेच्या माहेरची मंडळी प्रयागराजला चौकशी करण्यासाठी गेली असता तिथे घराला कुलूप असल्याचं आढळलं. त्यानंतर, निखिल त्यांच्यापासून काहीतरी लपवत असल्याचा पीडितेच्या घरच्यांना संशय आला.
हे ही वाचा: घरी सोडण्याच्या बहाण्याने प्रियकराने जंगलात नेलं अन् मित्रांसोबतच मिळून... हत्येनंतर मृतदेह नाल्यात...
कंपनीच्या एचआरकडून मिळाली माहिती
यानंतर पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांना निखिलच्या विंध्यनगरमधील घराचा तपास करण्यास सांगितलं. त्यानंतर, पोलिसांनी निखिलच्या घराचं कुलूप तोडून तपास केला पण त्यांना काहीच संशयास्पद सापडलं नाही. निखिल काम करत असलेल्या कंपनीच्या एचआरकडून पोलिसांना प्रकरणासंदर्भात माहिती मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिलने प्रयागराजमधील शंकरघाट येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले असल्याचं निखिलने त्यांना व्हॉट्सअॅप कॉलवर सांगितलं. पोलिसांनी तात्काळ प्रयागराज गाठलं आणि तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा: BEST Election: ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईतल्या निवडणुकीत कशामुळे झाला एवढा दारूण पराभव?
सीसीटीव्हीच्या आधारे प्रकरणाचा खुलासा
आरोपी पतीने त्याच्या पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि गाडीच्या मागच्या सीटवर ठेवून तो प्रयागराजला नेला. सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी त्याने गाडीच्या काचांवर पडदाही लावला होता. पोलिसांनी आरोपी निखिल दुबे आणि त्याची आई दुर्गेश्वरी देवी यांना प्रयागराजमधील शास्त्री नगर येथून अटक केली. त्यांच्याविरुद्ध पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
