‘येशूला भेटायचं आहे? तर उपवास पकडा’, धर्मोपदेशकामुळे मृतदेहांचा पडला खच!

रोहिणी ठोंबरे

• 05:51 PM • 25 Apr 2023

देवाला भेटण्याच्या इच्छेने काही लोक एका चर्चच्या मुख्य धर्मोपदेशाकडे गेले आणि परत आलेच नाहीत. आतापर्यंत सुमारे 60 मृतदेह मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उपासमारीने सर्वांचा मृत्यू झाल्याचे समजते.

Mumbaitak
follow google news

Pastor ordered followers to fast to meet Jesus : सध्या अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे अनेकजण अचानक बेपत्ता होत आणि त्यांचे मृतदेह सापडले आहेत. आफ्रिकेतील केनियामध्ये हा प्रकार घडला आहे. देवाला भेटण्याच्या इच्छेने काही लोक एका चर्चच्या मुख्य धर्मोपदेशाकडे (Pastor) गेले आणि परत आलेच नाहीत. आतापर्यंत सुमारे 60 मृतदेह मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उपासमारीने सर्वांचा मृत्यू झाल्याचे समजते. या धर्मोपदेशकाने लोकांना ‘येशू’ला भेटायचे असेल तर मरेपर्यंत उपाशी राहावे, असे आदेश दिले होते. (Pastor ordered followers to fast to-meet jesus People died of because of hunger)

हे वाचलं का?

पॉल मकेंझी (Paul McKenzie) असे या आरोपी धर्मोपदेशकाचे नाव आहे. त्याच्या आदेशाचे पालन करत अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेल्या सहा डझन म्हणजेच 72 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. परंतु काहींचे मृतदेह अजून मिळालेले नाही आहेत. आरोपी पॉल मकेंझीच्या शेतात पोलिसांना अनेक कबरी सापडल्या आहेत, ज्यामध्ये लोकांना योग्यरित्या दफन करण्यात आले नव्हते. सध्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 14 एप्रिल रोजी आरोपी धर्मोपदेशकाला अटक करण्यात आली आहे.

CM एकनाथ शिंदे सुट्टीवर! मुंबई अन् ठाणे सोडून थेट सातारा गाठलं; कारण रात्री 2 वाजता…

या प्रकरणाबाबत गुप्त माहिती मिळताच पोलीस आरोपींच्या शेतात बांधलेल्या गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चमध्ये पोहोचले. येथे 15 लोक उपासमारीने त्रस्त आढळले, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला होता. ते मकेंझीचे अनुयायी होते. अहवालात असे नमूज करण्यात आले आहे की, आरोपी धर्मोपदेशकाने अनुयायांना ‘येशूला भेटण्यासाठी’ शेवटच्या श्वासापर्यंत उपवास पकडण्यास सांगितले होते. यावर अनुयायांनी आंधळा विश्वास ठेवत मकेंझीचा आदेश स्वीकारला आणि मृत्यूला कवटाळले.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी अजूनही सुरू आहे खोदकाम…

पोलीस तपासणी करत असताना त्यांना शेतात अनेक कबरी सापडल्या. आता येथून एकामागोमाग एक मृतदेह सापडत, मृतदेहांचा खच पडला आहे. खोदकाम काम सुरू आहे. या अटकेपूर्वीही आरोपी मकेंझीची दोनदा सुटका झाली आहे. एकदा 2019 मध्ये आणि दुसऱ्यांदा या वर्षी मार्चमध्ये. ही प्रकरणे मुलांच्या मृत्यूशी संबंधित आहेत. प्रत्येक वेळी त्याला जातमुचलक्यावर जामीन मिळतो.

अखेर कंडका पडला! ‘राजाराम कारखान्यात’ वाजली महाडिकांची शिट्टी; पाटील गटाचा धुव्वा

या दोन्ही प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही मकेझी आजही वठणीवर आलेला नाही आहे. चार दिवस पोलीस कोठडीत असताना त्यांने उपोषण केले होते. नंतर त्याची सुटका करण्यात आली. एकीकडे स्थानिक नेते आरोपी मकेंझीला सोडू नका अशी न्यायालयाकडे विनंती करत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते त्याच्या बाजूने आवाज उठवत आहेत. त्याचवेळी येथीस, गृहमंत्री किथुरे किंडिकी यांनी या प्रकरणाचे वर्णन ‘विश्वास स्वातंत्र्याच्या घटनात्मक मानवी हक्काचा स्पष्ट गैरवापर’ असे केले आहे.

    follow whatsapp