Gangrape Crime News : कर्नाटकच्या बंगळुरुत एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. मित्राच्या घरी आलेल्या महिलेसोबत सामुहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडलीय. परपन्ना अग्रहारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या डोड्डांगमंगला येथे नराधमांनी महिलेवर गँगरेप केला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, महिला जेव्हा तिच्या मित्रांच्या घरी गेली, तेव्हा दोन आरोपी घरात घुसले. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल न करण्याची धमकी दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेनं तिच्या मित्रांच्या खात्यात आरोपींसाठी पैसै ट्रान्सफर केले. त्यांनी कथितपणे ते पैसे सट्टा लावणाऱ्या अॅपवर ट्रान्सफर केले. याशिवाय आरोपींनी दोन मोबाईल फोनही हिसकावून घेतले.
तीन संशयितांना घेतलं ताब्यात
आरोपीं घरातून एक रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनही घेऊन गेले. जो लोन घेतला आहे, त्याचं हे ऐवज आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी परप्पना अग्रहरा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. परप्पना अग्रहारा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
हे ही वाचा >> 12 वर्षांच्या मुलाच्या हाताला चावला, सटासट कानशिलात मारल्या कारण फक्त.. हा विचित्र माणूस आहे तरी कोण?
डीसीपी सारा फातिमाने म्हटलं की, पीडित महिलेनं तक्रारीत सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. आम्ही आरोपींना पकडलं आहे आणि पुढील तपास सुरु आहे. आम्ही पीडितीकडून करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासत आहोत. एका अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून पीडिता त्या ठिकाणी गेली होती. तिच्या आरोपांच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही आरोपींकडे कसून चौकशई करत आहोत.
हे ही वाचा >> घोर कलियुग! मुलगा पडला सावत्र 'मम्मी'च्या प्रेमात जडलं प्रेम, पळून गेले अन्; वडिलांनी तर..
पुण्यातही एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 73 वर्षीय वृद्धाने एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केला होता. क्लिनिकमध्ये एकटीला पाहून वृद्धाने पातळी सोडून "मला एक पप्पी दे" असं म्हणत तरुणीसोबत अश्लील वर्तन केलं होतं. या प्रकरणी आता संबंधित वृद्धावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
