Crime News: शुक्रवारी (31 ऑक्टोबर) रात्री मथुरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील वृंदावन कोतवाली परिसरातील गोरा नगर कॉलनीमध्ये वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला आणि यामध्ये दोघांची हत्या झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रकरणातील वडील आणि मुलगा हे प्रतिष्ठित बीडी व्यापारी असल्याचं सांगितलं जात आहे. 'दिनेश बिडी वाले' नावाचा त्यांचा एक व्यवसाय आहे.
ADVERTISEMENT
वडिलांवर गोळी झाडली...
घटनेतील वडिलांचं नाव सुरेश चंद्र अग्रवाल आणि मुलाचं नाव नरेश अग्रवाल असल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या वादातून नरेशने पिस्तूलमधून गोळी झाडली आणि ती सुरेश म्हणजेच वडिलांच्या छातीत लागली. वडिलांनी गोळी लागल्याचं समजताच नरेशने आपल्या डोक्यात सुद्धा गोळी झाडली. घटनेनंतर, नातेवाईकांनी तातडीने दोघांना रामकृष्ण मिशन सेवाश्रम रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
संबंधित प्रकरण हे वृंदावनच्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात 'दिनेश बीडी वाले' नावाने हे कुटुंब प्रसिद्ध आहे. या व्यवसायाचे मालक सुरेश चंद्र अग्रवाल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या मुलासोबत त्यांच्या घरी होते. त्यावेळी, अचानक दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की नरेशने आपली पिस्तूल बाहेर काढली आणि त्यातून गोळी चालवली.
हे ही वाचा: भाच्याला मामीसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध... मामासोबत वाद पेटला अन् 'अशी' केली निर्दयी हत्या!
नंतर, तरुणाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली
या हल्ल्यात पीडित वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर, आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याने आरोपी नरेशने स्वत:वर गोळी चालवली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक गोळा झाले. या घटनेने घरच्यांना सुद्धा मोठा धक्का बसला. त्यानंतर, दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्या दोघांना डॉक्टरांना मृत घोषित केलं.
हे ही वाचा: ठाकरे बंधू आणि मविआच्या निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा'ला सुरुवात; पण मागण्या कोणत्या?
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत वडील आणि मुलामध्ये कोणत्या तरी कारणावरून कौटुंबिक वाद झाला. त्यानंतर, नरेशने त्याचे वडील सुरेशवर गोळी झाडली. वडिलांना गोळी लागल्याने नरेशने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. आता या प्रकरणासंदर्भात कुटुंबियांची चौकशी केली जात असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












