ठाकरे बंधू आणि मविआच्या निवडणूक आयोगाविरोधातील 'सत्याचा मोर्चा'ला सुरुवात; पण मागण्या कोणत्या?
Satyacha Morcha, Mumbai : ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'; पण मागण्या कोणत्या?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाकरे बंधू आणि मविआचा निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'
मनसे आणि महाविकास आघाडीच्या मागण्या कोणत्या?
Satyacha Morcha, Mumbai : मतदारयाद्यांतील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येत आहेत. दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात “सत्याचा मोर्चा” (Satyacha Morcha Mumbai) काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे. शिवाय महाविकास आघाडीतील इतर नेतेही या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणामुळे मतदारयाद्यांमध्ये घोळ, मतचोरी आणि निवडणुकीतील गैरव्यवहार वाढल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात येत आहे. जनतेसमोर सत्य यावं आणि आयोगाच्या कारभारातील अनियमितता उघड व्हावी, या उद्देशाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची सुरुवात दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथून होणार असून, तो मेट्रो सिनेमा मार्गे पुढे जात मुंबई महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेल. राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटपर्यंत प्रवास करून मोर्चात सहभागी झाले असून, सध्या ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबले आहेत.
हेही वाचा : आईच्या अंत्यदर्शनासाठी बंगळुरुहून निघाला, पण सांगलीला येत असताना तरुणाला मृत्यूने कवटाळले
विरोधकांच्या मागण्या कोणत्या?
मतदारयाद्या त्वरित अद्ययावत करण्यात याव्यात.










