पुणे: शिक्षकाकडून नववीतील मुलीचा छळ, नको तिथेच स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप

मुंबई तक

16 Jul 2026 (अपडेटेड: 16 Jul 2026, 05:25 PM)

Pune Crime : पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाणे परिसरात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना आहे. या घटनेनं शहर हादरून गेलं आहे. लैंगिक छळ करणारी व्यक्ती ही रोबोटिक्स शिक्षक असल्याचे सांगण्यात येते. पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक केली. 

Pune Crime

Pune Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नववीत शिक्षण विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून लैंगिक छळ

point

शिक्षकाकडून मुलीला अनेकदा चुकीचा स्पर्श 

Pune Crime : कृष्णा पांचाळ - पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाणे परिसरात इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना आहे. या घटनेनं शहर हादरून गेलं आहे. लैंगिक छळ करणारी व्यक्ती ही रोबोटिक्स शिक्षक असल्याचे सांगण्यात येते. आरोपीचे नाव आरिफ सय्यद असे असून पीडित विद्यार्थिनी त्याला लहानपणापासून ओळखत होती. काही दिवसांनंतर विद्यार्थिनीने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली, तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुण महिलांची अंतर्वस्त्रे चोरून परिधान करायचा, छुप्या कॅमेऱ्यात सगळंच रेकॉर्ड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडले होते. नंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने इतर कोणत्याही विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, याचा तपास सुरू आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, इयत्ता आठवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पीडित विद्यार्थिनी रोबोटिक्सचं शिक्षण समजून घेण्यासाठी आरोपी शिक्षकाच्या संपर्कत होती. आरोपी एका मदरशातील मुलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन रोबोटिक्सचे प्रशिक्षण देतो. पीडित विद्यार्थिनी त्याच्या वर्गात मदत करायची आणि मुलांना शिकवण्यातही तिचे सहकार्य होते. वर्ग संपल्यानंतर आरोपी शिक्षकाने तिला अनेकदा दुचाकीवरून घरी सोडले होते.

शिक्षकाकडून मुलीला अनेकदा चुकीचा स्पर्श 

अनेकदा संगणकावर एखादी गोष्ट समजून सांगताना आरोपी शिक्षकाने तिला अनेकदा चुकीचा स्पर्श केला होता. तीन-चार आठवड्यांपूर्वी पीडित विद्यार्थिनी मदरशातील मुलांना ऑनलाइन रेबोटिक्स वर्ग घेण्यासाठी आरोपीच्या घरी गेली. वर्ग रात्री उशिराने दीड वाजताच्या सुमारास संपला होता. उशीर झाल्याने आरोपीने तिला तिथेच थांबण्यास सांगून सकाळी घरी जाण्यास सांगितल्याचा आरोप आहे. 

गुप्तांगाला स्पर्श केल्याचा पीडितेचा आरोप 

पीडितेनं याबाबत आपल्या पालकांना कल्पना देऊन ठेवली होती. इतर विद्यार्थी देखील तिथेच थांबून होते. आरोपीची मुलगी देखील घरीच उपस्थित होती. तिथे तिला थांबण्याबाबत काहीही गैर वाटले नाही. रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर गुप्तांगाला कोणीतरी स्पर्श करत असल्याचे विद्यार्थिनीला जाणवले. तिला दचकून जाग आल्यानंतर आरोपी आरिफ सय्यद समोर उभा असल्याचे तिला दिसून आले. या घटनेनं पीडित मुलगी ही दुसऱ्याच दिवशी घरी परतली होती. मात्र, भीतीपोटी तिने या घटनेची माहिती कोणालाच सांगितली नाही. 

हे ही वाचा : 'जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच...', आदिनाथ-उर्मिलाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

नंतर पीडिता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली असून मोठ्या बहिणीने तिला याबाबतचे कारण विचारले असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी आरोपीशी संपर्क साधून जाब विचारला. तक्रारीनुसार, आरोपीने चूक मान्य केली आणि माफी मागितली. असातच आंबेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपी शिक्षक आरिफ सय्यदच्या मुसक्या आवळल्या.