Govt Bank Jobs : पदवीधर तरुणांना सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

पदवीधर उमेदवारांसाठी एका सरकारी बँकेत नोकरीची संधी चालून आलीये. यासाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, जाणून घेऊया.

Governmet Bank Jobs

Governmet Bank Jobs

मुंबई तक

• 12:17 PM • 01 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पदवीधर तरुणांना सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

point

'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

Governmet Bank Jobs : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित 'पंजाब अँड सिंध बँक' (Punjab & Sind Bank) मार्फत 'लोकल बँक ऑफिसर' (LBO) या पदासाठी तब्बल 1000 जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे बँकिंग क्षेत्रात अनुभवी असलेल्या उमेदवारांना अधिकृत अधिकारी पदावर काम करण्याची नामी संधी मिळणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

हे वाचलं का?

अशी आहे पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अनिवार्य आहे. केवळ पदवी असून चालणार नाही, तर उमेदवाराकडे कोणत्याही बँकेत अधिकारी (Officer) म्हणून किमान 18 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या अनुभवाच्या अटीमुळे अनुभवी प्रोफेशनल्सना या भरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. पात्र उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्त केले जाऊ शकते.

हे ही वाचा : अकोला : 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..' महिला आरोपीकडे पोलिसाची आक्षेपार्ह मागणी; व्हिडिओ व्हायरल

वयोमर्यादा आणि अर्जासाठी शुल्क

वयोमर्यादेचा विचार केल्यास, 1 मार्च 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट समाविष्ट आहे. अर्जासाठी सर्वसाधारण (General), OBC आणि EWS उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी केवळ 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : April Fool नाही बरं... आजपासून बदलणार 8 मोठे नियम, पगारामध्ये तुम्हाला बसणार मोठा धक्का!

अर्जाची शेवटची तारीख

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2026 असून, त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे मुदतीपूर्वीच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रातील शाश्वत करिअर आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या अनुभवी तरुणांसाठी ही एक महत्त्वाची जाहिरात मानली जात आहे.