प्रविण ठाकरे, नाशिक: महिला लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या तपासात दररोज काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाली आहे. 29 तारखेला अशोक खरातच्या रिमांडसाठी मागणी करताना नाशिक कोर्टात SIT ने उल्लेख केला होता की महिलांना गुंगीचे औषध दिले जायचे. सोबत ओश्नोजलसह अन्य काही वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड गोष्टींचा संबंध आणि उल्लेखही या प्रकरणात आढळून आले आहेत. त्याचमुळं आता तीन डॉक्टर आणि काही मेडिकल्स तसेच लॅब्सची चौकशी होऊ शकते.
ADVERTISEMENT
नेमकं काय-काय करायचा भुरटा अशोक खरात?
नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर खरातच्या या कांडामध्ये सहभागी आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या दिशेने विशेष तपास पथक (SIT) ने तपास करत तीन डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित पॅथॉलॉजी लॅब व मेडिकल देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेनकिलर सोडल्या तर गुंगी येण्यासाठी वापरल्या गेलेल्या झोपेच्या गोळ्या देखील खरात आपल्या घाणेरड्या कृत्यांमध्ये वापरायचा.
हे ही वाचा>> भयंकर... “भोंदूबाबा अशोक खरात राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता, अन् स्वत:ही...”
या गोळ्या डॉक्टरांच्या प्रस्क्रिपशन शिवाय विकत घेता येत नाहीत किंवा मेडिकल शॉपमधील फार्मसिस्ट विकू शकत नाहीत. कारण गोळ्यांच्या डोस जर अनियंत्रित घेतला तर गुंगी येते, अधिक डोस झाला तर मृत्यूही ओढवू शकतो. याशिवाय पॅथॉलॉजी लॅब आणि सोनोग्राफी सेंटरचा वापर देखील झाला असल्याचा संशय आहे, तो कशासाठी झाला हे ही तपासले जात आहे.
सध्या पोलीस कस्टडीत असलेल्या अशोक खरातची SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. या तपास पथकाच्या चौकशीत खरात याच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. महिलांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात काही विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या देत होता का? आणि ही औषधे त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळत होती? या दिशेने देखील आता तपास सुरू आहे. यातील औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला? आणि त्यामागे कोणत्या नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत? यावर आता तपास यंत्रांनी लक्ष केंद्रित केले आहे
अशोक खरातमुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी मागितलं Work from Home
दरम्यान, आता नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित व्हायरल व्हिडिओ प्रकरणामुळे पीडितांच्या कुटुंबीयांचे जीवन मोठ्या संकटात सापडले आहे. एका पीडितेच्या नातेवाईकाने सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना अनेक दिवस कार्यालयात जाणे टाळावे लागले आणि आता त्यांनी घरातून काम करण्याची (Work from Home)परवानगी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्ट्या खचले आहे.
हे ही वाचा>> शक्तीवर्धक औषधांच्या अतिसेवनाने अशोक खरातला आलेला अर्धांगवायूचा झटका; अजूनही...
या प्रकरणात अनेक पीडितांनी अशोक खरातविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. तपास यंत्रणांच्या मते, हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत आणि काही क्लिप्स आक्षेपार्ह वेबसाइट्सवरही पोहोचल्या आहेत, ज्यामुळे गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन होत आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, व्हिडिओ सतत शेअर केल्यामुळे कुटुंबांवर केवळ मानसिक दबावच वाढत नाही, तर संभाव्य साक्षीदार पुढे येण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यामुळे तपासावर परिणाम होत आहे. अनेक कुटुंबांनी सततची चिंता आणि सामाजिक दबावाचा अनुभव येत असल्याचे सांगितले, तर नातेवाईकांचे सतत फोन येत आहेत, ज्यांना उत्तर देणे कठीण आहे.
23 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई सुरू केली आहे. अनेक वृत्तवाहिन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
विशेष तपास पथकाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 170 वेबसाइट्सवरून आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरही कारवाई सुरू आहे, मात्र व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या खाजगी प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओंचा प्रसार रोखणे हे एक मोठे आव्हान आहे.
नाशिक सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत असून, अश्लील वेबसाइट्सवर पोहोचल्याचा आरोप असलेल्या व्हिडिओंसह आक्षेपार्ह सामग्री हटवण्यासाठी सतत कारवाई केली जात आहे.
एकूणच सातत्याने या प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. यात एसआयटी आणखी कुठवर पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
ADVERTISEMENT











