40 वर्षीय महिलेची 28 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख, चार मुलं सोडून पत्नी बॉयफ्रेंडसोबत गेली पळून

मुंबई तक

30 Mar 2026 (अपडेटेड: 30 Mar 2026, 05:58 PM)

Crime news : एका महिलेचे इंस्टाग्रामवरून एका महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. महिला ही चार मुलांची आई होती. तिने आपला नवरा आणि चार मुलांना सोडलं, ती एका इंस्टाग्रामवर बोलणाऱ्या तरुणासोबत पळून गेली. पोलीस ठाण्यात तरुणाला दोन तास समजावण्यात आले होते.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

40 वर्षीय महिलेची 28 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख

point

महिला बॉयफ्रेंडसोबत भाडेतत्त्वार राहत होती

Crime news : एका महिलेचे इंस्टाग्रामवरून एका महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. महिला ही चार मुलांची आई होती. तिने आपला नवरा आणि चार मुलांना सोडलं, ती एका इंस्टाग्रामवर बोलणाऱ्या तरुणासोबत पळून गेली. पोलीस ठाण्यात तरुणाला दोन तास समजावण्यात आले होते, महिला प्रियकराला सोडून घरी जाण्यास तयार झाली होती. पोलिसांनी त्या महिलेला तिच्या पती आणि मुलांच्या ताब्यात दिले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : तरुणाची नोकरी गमावली, पुण्यातल्या एफसी रोड परिसरात स्वत:चा गळा चिरला अन्...

40 वर्षीय महिलेची 28 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख

घडलेल्या घटनेनुसार, 40 वर्षीय महिलेची एका 28 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. हळूहळू दोघांमधील नात्यांचे प्रेमाच्या नात्यात रुपांतर झाले होते. तिच्या अचानकपणे निघून जाण्याने तिच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी शोध सुरु केला असता, ती सापडलीच नाही. 

महिला बॉयफ्रेंडसोबत भाडेतत्त्वार राहत होती

काही दिवसानंतर, महिला पीपीगंज परिसरात एका भाडेतत्त्वावर प्रियकरासोबत राहत असल्याची माहिती आहे. शनिवारी, संबंधित महिलेचा पती, तिची मुलं आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी तिची शोधाशोध केली. मुलांनी आईला बघताच घरी परत येण्यास सांगितले, परंतु पोलीस महिलेनं सुरुवातीला तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा तिने निर्णय घेतला.  

नवरा आणि बायको या दोन्ही कुटुंबातील वाद विकोपाला गेला. याचदरम्यान, पीपीगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार अरुण कुमार सिंग यांच्या उपस्थितीत दोन तास पंचायत घेण्यात आली, ज्यात तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : मित्र नव्हे, तर वासनेचे भुकेले लांडगे; दोस्ताच्या पत्नीवर वाईट नजर.., बायको एकटी असताना घरात शिरले

संबंधित प्रकरणात मुलांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतर, सततच्या विनंतीनंतरही महिलेनं प्रियकरासोबत न राहता घरी परतण्याची संमती दिली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अरुण सिंग यांनी सांगितलं की, त्या महिलेचे समुपदेशन करून तिला कुटुंबीयांसोबत सुखरुप घरी पाठवण्यात आले.