Crime News : एका हाऊसिंग बोर्ड कॉलनीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका बीएड विद्यार्थिनीची तिच्याच साथीदाराने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थिनी मूळची छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील कोकपूर गावची रहिवासी असून ती रायपूरच्या विकास महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
सात महिन्यांपासून लिव्ह-इनमध्ये
गेल्या सहा-सात महिन्यांपासून ही विद्यार्थिनी सावंत बघेल नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. सावंत हा मूळचा कोंडागावचा असून तो डीएलएडचे शिक्षण घेत आहे. दोघांची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख होती आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सावंत तिच्यावर सतत संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद आणि भांडणे होत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा : हिंगोलीत आयुष्य संपवलेल्या मुलाच्या आईची Abhijit Dipke यांच्याकडून काय अपेक्षा?
आधी मारहाण, नंतर आवळला गळा
घटना घडण्याच्या आदल्या दिवशी विद्यार्थिनीने तिच्या बहिणीला फोन करून सावंतने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे सांगितले होते. परंतु, या वादाचे रूपांतर एवढ्या मोठ्या दुर्घटनेत होईल याची कल्पना तिच्या कुटुंबाला नव्हती. आरोपीने आधी विद्यार्थिनीला मारहाण केली आणि त्यानंतर तिचा गळा आवळला. तिची प्रकृती खालावल्याने आरोपी तिला आंबेडकर रुग्णालयात घेऊन गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर आरोपी रुग्णालयातून पसार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढले.
हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : अरबी समुद्रात नैऋत्य वारे अॅक्टिव्ह, महाराष्ट्रावर धडकणार; कुठे कुठे अलर्ट?
दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी सावंत बघेलला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि आरोपीच्या जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. या हत्येमागील मुख्य कारण आणि घटनेपूर्वी दोघांमध्ये नेमके काय घडले होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT












