लग्न होत नाही म्हणून आईनं पोटच्या लेकीला संपवलं, धाकटी बहीण होती सामील

मुंबई तक

05 Aug 2026 (अपडेटेड: 05 Aug 2026, 02:34 PM)

Crime News : मुलीचा विवाह होत नव्हता म्हणून आईने मुलीची हत्या केली. मुलीच्या धाकट्या बहिणीचा देखील या हत्येत समावेश होता. मृतक तरुणीची जुमनी अशी ओळख समोर आली होती.

UP Crime News

UP Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपी आई आणि मुलीला अटक 

point

आई आणि बहिणीने मिळून धारदार शास्त्रांनी पीडितेचा गळा चिरला

Crime News : मुलीचा विवाह होत नव्हता म्हणून आईने मुलीची हत्या केली. मुलीच्या धाकट्या बहिणीचा देखील या हत्येत समावेश होता. मृतक तरुणीची जुमनी अशी ओळख समोर आली होती. पीडितेचा विवाह होत नसल्याच्या कारणावरून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना बिहारच्या अररिया जिल्ह्यातील जोकीहाट ठाणे क्षेत्रातील हय्याधर गावातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी गर्भवती मुलीला नदीत बुडवलं, मृत्यूची स्थिती रेकॉर्ड

अवघ्या 24 तासांपूर्वी जेव्हा पोलिसांनी जमुनीचा गळा चिरून झालेल्या हत्येचे गूढ उककले, तेव्हा सत्य जाणून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. जुमनीचा जीव कोणत्याही इतर व्यक्तीने घेतला नसून तिची आई फतिमा आणि बहीण आशियाने घेतला. या घटनेमुळे व्यथित झालेल्या मृत जुमनीचे वडील मोहनिस यांनी जोकीहाट पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलीविरोधात तक्रार दाखल केली होती.

आरोपी आई आणि मुलीला अटक 

दरम्यान, जोकीहाट पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या आई आणि मुलीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. दाखल करण्यात आलेल्या एफआरआयनुसार, या भयंकर कटामागील कारणे अत्यंत धक्कादायक आहे. एफआरआयमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, असं उघडकीस करण्यात आलं की, जुमनी मतिमंद होती. तिचे लग्न होऊ शकत नसल्याने कुटुंबाला समाजाला तोंड द्यावे लागत होते. याचमुळे घरात वाद निर्माण झाला होता. 

आई आणि बहिणीने मिळून धारदार शास्त्रांनी पीडित जुमानचा गळा चिरला

दरम्यान, जोकीहाट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या वादात आई आणि मुलीने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे त्यांना जुमनीला मार्गातून दूर करायचे होते. दुसरीकडे आपल्या शेजारील राहणाऱ्यावर खूनाचा आरोप करण्यात आला होता. या कटाचा भाग म्हणून आई आणि बहिणीने मिळून धारदार शास्त्रांनी पीडित जुमानचा गळा चिरून खून केला.  

हे ही वाचा : Astrology : शनि नक्षत्राचे परिवर्तन, 'या' राशींची वाढणार समस्या

संबंधित प्रकरणात न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या एका पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, नंतर पुरावे गोळा केले. पोलीस तपास आणि पुराव्यांच्या आधारे आरोपींची चौकशी केल्यानंतर आई आणि मुलीने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला.