Crime News : उत्तर प्रदेशातून ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लेकीच्या लव्ह मॅरेजनंतर तिच्याच वडिलांनी नवविवाहितेला दिल्लीहून आणलं आणि नंतर चंबल येथील नदीत बुडवून तिची हत्या केली. विवाहित मुलीचं वय वर्षे 18 आहे. पीडित नवविवाहित गर्भवती होती. हत्यादरम्यान तिच्या वडिलांनी व्हिडिओ बनवला होता. दिल्ली पोहचून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शनि नक्षत्राचे परिवर्तन, 'या' राशींची वाढणार समस्या
घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांना वडिलांवरती संशय आला होता. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक करत तुरुंगात टाकलं. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत दिल्ली पोलीस वडिलांना कोठडीत घेऊन बसौनी परिसरात पोहोचले. आरोपीचा एक नातेवाईक त्यांच्यासोबत आहेत. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
वडिलांकडून लेकीच्या हत्येचा आरोप
बसौनी येथील नखनापुरी गावातील रहिवासी असलेल्या लखपत सिंगवर त्याच्या मुलीच्या हत्येचा आरोप करण्यात आलाय. दिल्ली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लखपत सिंह दिल्लीतील तिगरी परिसरातील आपल्या कुटुंबासोबत राहतो. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आलाय की, 29 जुलै रोजी सकाळी वडील लखपत सिंग आपल्या मुलीला औषध आणण्याच्या बहाण्याने बसौनी परिसरात घेऊन आले.
मोबाईल फोनने घटनेचा फोटो आणि व्हिडिओ केला रेकॉर्ड
त्यांनी चंबळ नदीत बुडवून मारले, दरम्यान असे म्हटले जाते की, वडिलांनी आपल्या मोबाईल फोनने या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ देखील काढले होते. घरी परतल्यानंतर त्यांनी दक्षिण दिल्लीतील तिगरी पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा जसा तपास पुढे सरकला, तसा पोलिसांनी अधिक संशय बळावला गेला.
हे ही वाचा : 'वहिनी, आपण लग्न करु..' दीराने शारीरिक संबंध ठेवले, पण शेवटी घडलं नको तेच!
मंगळवारी चंबळ नदीत पोलीस बसौनी पोलीस ठाणे हद्दीतील लखनपुरा गावात दाखल झाले, नंतर त्यांनी तपास सुरू केला होता. तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पीएसीच्या पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले, नदीत बचाव आणि शोधमोहीम सुरू केली जात आहे.
ADVERTISEMENT












