'वहिनी, आपण लग्न करु..' दीराने शारीरिक संबंध ठेवले, पण शेवटी घडलं नको तेच!

मुंबई तक

भावाच्या मृत्यूनंतर दीराने वहिनीला लग्नाचे आश्वासन दिले. तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने गुपचूप दुसरे लग्न केले. उत्तर प्रदेशातील या घटनेत पुढं काय घडलं, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वहिनी, आपण लग्न करु..

point

दीराने शारीरिक संबंध ठेवले

point

पण शेवटी घडलं नको तेच!

Crime News : नात्याला काळिमा फासणारी आणि विश्वासाला तिलांजली देणारी एक घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या चार मुलांच्या आईची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे वर्षाभरापूर्वी पतीच्या मृत्यूनंतर दिराचा सहारा मिळेल या आशेवर ही महिला होती. मात्र, लग्नाचे खोटे आमिष दाखवून दिरानेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील ही घटना आहे.

शारीरिक संबंध अन् लग्नाचं वचन

मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर आरोपी दीर हेमराज याने पीडितेला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. या विश्वासाच्या आधारे त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान पीडित महिला चार महिन्यांची गरोदर राहिली. मात्र, गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि 23 जुलै रोजी दुसऱ्याच तरुणीशी विवाह केला.

हे ही वाचा : रीलस्टारचं अपहरण, 12 तास गाडीत डांबलं, घडलं ते ऐकून धक्का बसेल!

दीराविरोधात गुन्हा दाखल

दीराने दुसरा विवाह केल्याने पीडितेला धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने न्यायासाठी थेट पोलीस प्रमुखांकडे (एसपी) धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार धनारी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस तपासाला वेग आला.

हे ही वाचा : 25 वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेवर जीव जडला, लग्नाला नकार देताच केलं भयानक कांड

दीराला अटक

मंगळवारी पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी हेमराज याला अटक केली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.