रीलस्टारचं अपहरण, 12 तास गाडीत डांबलं, घडलं ते ऐकून धक्का बसेल!
Reel Star chetan deolkar kidnapping case : चिनी बेटिंग ॲप्सविरोधात सोशल मीडियावर जनजागृती करणाऱ्या कंटेंट क्रिएटर चेतन देवळकर यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रीलस्टारचं अपहरण
12 तास गाडीत डांबलं
घडलं ते ऐकून धक्का बसेल!
Reel Star chetan deolkar kidnapping case : सोशल मीडियावर चिनी बेटिंग ॲप्सचा प्रचार करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावण्याचा प्रकार सुरू असताना, त्याविरोधात जनजागृती करणाऱ्या 28 वर्षीय कंटेंट क्रिएटर चेतन देवळकर यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेतन गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या ‘रिलेट विथ चेतन’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चिनी बेटिंग ॲप्सची पोलखोल करणारे व्हिडिओ तयार करत होते. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्स अशा ॲप्सचा प्रचार करून तरुणांना जाळ्यात ओढत असल्याचा आरोप करत त्यांनी त्याविरोधात सातत्याने रील्स बनवल्या. मात्र याच मोहिमेमुळे त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 26 जुलै रोजी सकाळी घडली असून बेटिंग ॲप्सच्या विषयावर चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना पवईतील पंचकुटीर परिसरात बोलावण्यात आले.
हेही वाचा : 25 वर्षीय तरुणाचा विवाहित महिलेवर जीव जडला, लग्नाला नकार देताच केलं भयानक कांड
"तू आमच्या बेटिंग ॲप्सविरोधात व्हिडिओ का बनवतोस?"
चेतन घटनास्थळी पोहोचताच काही जणांनी त्यांना जबरदस्तीने एका एसयूव्ही कारमध्ये बसवले. कारच्या पुढील आणि मागील सीटच्या मधोमध त्यांना अक्षरशः कोंबून ठेवण्यात आले. मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर एका आरोपीने त्यांच्या गळ्यावर पाय ठेवला, तर दुसऱ्याने सुरा दाखवत पोटात भोसकण्याची धमकी दिली. "तू आमच्या बेटिंग ॲप्सविरोधात व्हिडिओ का बनवतोस? जाहिरात करायची असेल तर कर, पण आमच्या विरोधात का जातोस?" असा जाब विचारत आरोपींनी त्यांना तब्बल 12 तास मारहाण केल्याचा आरोप आहे. अखेर जीव वाचवण्यासाठी यापुढे अशा प्रकारचे रील्स बनवणार नसल्याचे सांगितल्यानंतर रात्री सुमारे 11.35 वाजता त्यांना कळंबोली येथे रस्त्यावर सोडून आरोपी पसार झाले.
हेही वाचा : Personal Finance: डायमंड म्हणजे Investment की Luxury? खरेदीपूर्वी जाणून घ्या सत्य
