Personal Finance: डायमंड म्हणजे Investment की Luxury? खरेदीपूर्वी जाणून घ्या सत्य
Diamond Investment: डायमंड खरेदी ही गुंतवणूक समजावी की लक्झरी? नैसर्गिक आणि लॅब-ग्रोन डायमंडमधील फरक, रीसेल व्हॅल्यू, किंमतीतील चढ-उतार आणि खरेदीपूर्वी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for Diamond Investment: हिरा म्हणजे श्रीमंती, प्रतिष्ठा आणि आयुष्यभर टिकणारा दागिना अशी धारणा अनेकांची असते. लग्नसमारंभ, साखरपुडा किंवा खास प्रसंगी डायमंड ज्वेलरी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, डायमंड खरेदी ही खरोखरच फायदेशीर गुंतवणूक आहे का, की ती केवळ लक्झरीवरचा खर्च आहे? हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, डायमंडला लक्झरी प्रॉडक्ट म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. कारण सोन्याप्रमाणे डायमंडची किंमत सातत्याने वाढेल किंवा गरज पडल्यास सहज विकता येईल, याची हमी नसते.
डायमंड गुंतवणूक का मानली जात नाही?
1. रीसेल व्हॅल्यू मर्यादित असते
डायमंड खरेदी करताना आपण दगडाबरोबरच त्याची ज्वेलरी डिझाइन, मेकिंग चार्जेस, ब्रँडिंग आणि GST यासाठीही पैसे मोजतो. मात्र विक्रीच्या वेळी या खर्चाचा परतावा सहसा मिळत नाही. त्यामुळे विकताना अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळू शकते.
2. किंमत ठरवण्याचा एकसमान निकष नाही
सोन्याचा दर रोज जाहीर केला जातो. मात्र डायमंडसाठी असा सार्वत्रिक बाजारभाव नसतो. प्रत्येक हिऱ्याची किंमत त्याच्या Cut, Color, Clarity आणि Carat (4Cs) यावर अवलंबून असते.
